निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

प्रस्थापित राजकारण्यांचे तळवे चाटणाऱ्यांनो……!

यश भालेराव

भाजप हा सध्यपरिस्थीतील आंबेडकरी विचारांचा नंबर एक चा शत्रु आहे. हे बरयाच जनाना मान्य आहे… त्यामुळे काहीजन उघड भाजप पाठिंबा देतात…अशा महा…लायकांना बद्दल तर काहीच बोलु शकत नाही..
पण जे काॕग्रेस,राष्ट्रवादी ( पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वळचणीला बसुन त्या प्रस्थापितांनी खाऊन उष्टे टाकलेले हाडे चघळणारया करीता हा लेख

आर.एस.एस. ची स्थापना 1925 ला झाल्यावर त्या नंतर जनसंघ आणि नंतर भाजप ची स्थापना 1980 ला भाजपचा एकच खासदार झाला,. पण ते हरले नाहीत ..ते लढले 2019 ला किमान त्यांचे 303 खासदार झाले.
त्यांचा राजकिय पक्ष त्यांनी वाढवला,. प्रसंगी काही राजकीय पक्ष फोडले पण आज घडीला त्यांचे सर्वात जास्त खासदार आहेत.

बाबासाहेबांनी आधी शेड्युलड कास्ट फेडरेशन नंतर स्वतंत्र मजुर पक्ष असो 1952 काॕग्रेस नंतर प्रमुख राजकीय पक्ष हा आपला होता..

पण बाबासाहेबांनंतर दादासाहेब गायकवाड यांनी रिप्बलिकन पक्षाने थोडी चांगली कामगिरी केली पण सध्या रिप्बलिकन पक्षाची अवस्था अशी झाली आहे कि प्रस्थापित राजकीय पक्षाचे नेते आणि रिप्बलिकन पक्षाला किंवा आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाला एक ही जागा देत नाही.
काही आंबेडकरी समजले जाणारे तथाकथित नेते आणि पाकिटछाप स्वयघोषित नेते हे मात्र प्रस्थापित राजकीय पक्षाच्या वतीने त्यांनी चघळुन टाकलेले उष्टे हाडके चघळण्याचे काम करत आहे..
2019 ला बाळासाहेबांनी सर्व वंचित घटकांना बरोबर घेऊन राजकारण केले,. त्यामध्ये एकुण 42 लाख मतदान मिळाले..
आणि हे मिळालेले 42 लाख मतदान जर वंचितची स्थापना झाल्यावर 6 महिन्यातच मिळाले.तर आता 5 वर्षानंतर वंचितचे किमान 1 कोटी मतदार नक्कीच होतील,आणि त्यामुळेच प्रस्थापित राजकीय पक्ष घाबरले आहेत.
2019 ला अशोक चव्हाण यांच्यामुळे युती झाली नाही कारण चव्हाण हे विश्व हिंदु परिषदे शी निगडीत आहे.नुकतेच ते भाजप मध्ये ही गेले आहेत.
नाना पटोले हे मुळचे भाजपचे त्यामुळे या ..आणि शरद पवारांना आंबेडकरी समाजातील वैचारिक नकोच त्यांचे ऐकणारा पाहिजे एकादा गुंड असला तरी चालेल पण पवारांना आंबेडकरी समाजातील वैचारिक नको..
ठाकरे हे पवार जे बोलतील ते करणारे.. त्यामुळे या वर्षी निवडणुकीचे फाॕर्म भरे पर्यत या तीन ही राजकीय पक्षाचे आपआपसात जागा वाटपावरुन भांडणे चालले होती.. त्यामुळे वंचित आघाडीला त्यांनी जागा वाटपात बाहेरच ठेवले होते.

वंचितचे स्वाभिमानी राजकारण यांना लाळगोटेपणाचे राजकारण करण्याचा मानस होता.
कारण पटोले असो पवार असो यांना वंचितला बरोबर घ्यायचे नव्हते.
ज्या काॕग्रसने 2019 मध्ये एकच जागा फक्त 1300 मताने जिंकली त्यां काॕग्रेसच्या पटोले यांनी पण वंचितला शेवटपर्यत जागा वाटपासाठी बोलवले नाही..
आणि वेळ निघुन गेल्यावर मात्र जागा देतो याचे नाटक केले..

पण आंबेडकरी विचारांच्या स्वाभिमानी युवकांनी मात्र बाबासाहेबांच्या स्वप्नाचा विचार केला तर आपण राजकारणात कोठेच नाही असे जेव्हा दिसते त्यावेळी मात्र मोठी खंत वाटते. आपण फक्त प्रस्थिपित राजकारण्यांणाच सपोर्ट करायचा का ?
आंबेडकरी विचारांचे राजकीय पक्ष प्रमुख यांचे राजकारण कधी उभारी घेणार..
अशा वेळी त्यांना वंचित आघाडी सध्या जे करत आहे त्यांचा मनापासुन अभिमान वाटतो,.
पण
जे काही तथाकथित आंबेडकरी विचारांची झुल पांघरुन आहेत
त्यांना स्वाभिमानाचा अर्थच कळत नाही
त्यांना जर प्रस्थापिताचे उष्टे खाण्याचे ठरवले आहे तर ते प्रस्थापिताचे उष्टेच खाणार..
अशा गटारातल्या किड्याने त्याचे गटार हेच त्यांचे विश्व वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत गटारातच राहावे
त्या प्रस्थापिताच्या राजकीय पक्षातच राहावे त्याचे जे काही विचार आहेत ते पोहचवा उगीच विनाकारण वंचित आघाडीवर टिका करु नये.

ज्या प्रस्थापितांची रखेल राहायचे आहे त्यांनी बिनधास्त त्या प्रस्थापित राजकीय पक्षाची रखेल म्हणुन राहावे…
पण विनाकारण मी आंबेडकरी विचारांचा स्वाभिमानी आहे म्हणुन

2019 मध्ये बिनाशर्त शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
त्या आधी राष्ट्रवादीची स्थापना ही काॕग्रेसला विरोध (सोनिया गांधी प्रधानमंत्री होऊ नये म्हणुन झाली होती.ते त्यावेळी भाजपच्या पाठिब्याशिवाय राष्ट्रवादीची स्थापना झाली होती का याचा विचार करावा..

शिंदेना नमवण्यासाठी आणि मुंबई महानगरपालिका ठाकरे कडे असावी या करीता ठाकरे भाजपसंगे हातमिळवणी कधी ही करु शकतात.,

आणि शेवटचे एकच
अजित पवारांवर जो 70 हजार कोटींचा घोटाळा आहे.
त्यावर राष्ट्रवादी जर भाजप बरोबर आली तर गप्प बसेल. नाहीतर
आणि मोठ्या पवारांचा अजिता पवार यांना भाजप मध्ये जा म्हणुन सपोर्ट नसेल का ? याचा विचार करा..
आणि मोठे साहेब दाखवण्यासाठी येथे राहतील येथे राहुन आंबेडकरी विचारांच्या काहीना हाताशी धरुण वंचितच्या मतदानामध्ये फुट पाडणार…
आणि निवडणुकीनंतर जर गरज असेल भाजपवाशी होतील,
कारण 70 हजार त्या घोटाळ्यात एकटे अजित पवार यांचेच नाव असेल का ? याचा विचार जरा तळवे चाटणारया कथाकथितांनी करावा…
ज्याला काॕग्रेसने मुख्यमंत्री केले ते भाजप मध्ये गेले तर
नाना पटोले कधीपण पून्हा घरवापशी करतील,,

त्यामुळे भविष्यात आणि आता पण भाजप ला प्रमुख विरोधी पक्ष हा वंचित बहुजन आघाडीच आहे..

ज्या भाजपची आई हे आर.एस.एस आहे त्यामुळे भाजप सर्व निर्णय घेते
त्या आर.एस.एस. च्या प्रमुखावर त्या आणि त्या संघटनेच्या अवैद्य शस्त्र पुजनावर बाळासाहेबांनी कठोर भुमिका घेतली त्यामुळे वंचितला भाजपची बी टिम म्हणणारयांनो तुम्ही फक्त प्रस्थापिताचे तळवेच चाटण्याच्या लायकीचे आहेत हे लक्षात ठेवा.

आणि जरा विचार करा आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र हा एक पक्ष जर थोडी उभारी घेतोय तर तुमच्या पोटात का दुखतय..?
कधीतरी विचार करा
आंबेडकरी विचाराचे राजकारण कधी यशस्वी होईल याचा !
प्रस्थापिताच्या वळचळीला भुंकणारयांनो जरा विचार कराच..


आपलाच
यश भालेराव
9067047333

स्वाभिमानी आंबेडकरी विचारांच्या व्यक्तीने ही पोस्ट पुढे पाठवावी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!