नाशिक मध्ये लॅम्पची आजराचे थैमान

काही दिवसांपासून जनावरांमधील लम्पी आजाराने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुन्हा एकदा लम्पी आजाराने डोके वर काढले असून नाशिक जिल्ह्यात प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच प्रादुर्भाव वाढत आहे
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत असून त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. नाशिक जिल्ह्यातही हे प्रमाण वाढत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठक घेण्यात आली. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर लम्पीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच यासाठी स्थानिक पातळीवर योग्य त्या उपायोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सूचना दिलेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरणासाठी शीघ्र कृती दल स्थापन करून हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत लसीकरणाचे (Vaccination) नियोजनाबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच बाधित क्षेत्रातील म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. आंतर राज्य, आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस यंत्रणेचे सहाय्य घेण्यात यावे. तसेच परराज्यातून जे गोवर्गीय पशुधन आपल्या जिल्ह्यात येत असेल त्याच्या तपासणीसाठी आंतर राज्यमार्गावर तपासणी नाका सुरू करावा, असा सूचना करण्यात आलेल्या आहेत.
नाशिक सद्यस्थितीत एकूण गोवर्गीय पशुधन 8 लाख 46 हजार 745 असून यात 1449 जनावरे लम्पी बाधित आहेत. तर यातून 1106 जनावरे बरी झाली आहेत. सद्यस्थितीत 300 ऍक्टिव्ह केसेस असून 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत 97.5 टक्के जनावरांचे प्रतिबंधक लसीकरण झाल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे यांनी दिली आहे.
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये. ज्याठिकाणी गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास त्याबाबत तत्काळ लगतच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयास संपर्क साधावा. गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमीतपणे निर्जंतुक फवारणी करावी. त्याचप्रमाणे साथीच्या रोगामुळे मृत पावलेल्या जनावरांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत