देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

निर्भिड स्वाभिमानी आत्मविश्वासाचे दुसरे नाव; छत्रपती शिवाजी महाराज.

स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ..!

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इतिहासातील नोंदीनुसार, 3 एप्रिल 1680 साली शिवरायांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवप्रेमी दरवर्षी 3 एप्रिलला आपल्या रयतेच्या राजाच्या स्मृतिनिमित्त आपल्या भावना व्यक्त करत त्यांना कार्याला सलाम करतात.

अठरा पगड जातींना सोबत घेऊन सर्वांना आपलंसं वाटावं असं मराठ्यांचं स्वराज्य स्थापन करणार्‍या या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा वसा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया. जिथे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्याच महाराष्ट्रात आज मात्र दिल्लीवाऱ्या करून स्वाभिमान गहाण ठेवून लाचारी पत्करून स्वार्थी आणि संधीसाधू राजकारण चालू आहे. शिवरायांचे जीवन चरित्र जाणनारा कधी ना कोणा पुढे झुकतो ना चुकतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. मूठभर मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि बघता बघता मुघलांप्रमाणेच आदिलशाहीचाही महाराष्ट्रात शेवट केला.

यशवंत कीर्तीवंत। सामर्थ्यवंत वरदवंत।

पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

स्वराज्याचे संस्थापक

छत्रपती शिवाजी महाराज..

पराक्रमी योद्धा,

कुशल रणनीतिकार,

वीर महानायक

छत्रपती शिवाजी महाराज

विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, मुघल साम्राज्याविरुद्ध शिवराय शिताफीने लढले. गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मूठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी परकीय आक्रमणं परतून लावली. त्यांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.

जगाच्या इतिहासातील असा एकमेव राजा ज्याने रयतेचे राज्य निर्माण केले, कधी जातपात मानली नाही, ज्याने एकही लढाई हरली नाही, विजय मिळवा म्हणून कसले कर्मकांड अंधश्रद्धा केली नाही, विजयोत्सव म्हणून ज्याच्या दरबारात कधी नाच गाण्याची, नशेची मैफिल रंगली नाही, परस्त्री चा अपमान करणाऱ्याची कधी गय केली गेली नाही, राज्यकारभार करताना शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही ज्याने कधी धक्का लागू दिला नाही, अशा या महान पराक्रमी राजाला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!