ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या,व्यवसाय करा,समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही

ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या,व्यवसाय करा,समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही.ब्राम्हणाला दक्षिणा द्या,गाय दान करा, व्रत करा,उपवास करा,नाहीतर देवाचा कोप होईल असेच लिखान दिसेल.त्यांनी तुम्हाला देवाधर्मात, एकादस-बारस,शनी-मंगल-राहु-केतुच्या भिती मध्ये गुंतवून शिक्षणातील स्पर्धा संपवली.स्वतःच्या जातीचा मात्र मार्ग सोपा करुन घेतला.आज बहुजन समाजातील मुलांना गणपती समोर ढोल लेझीमचे खेळ खेळायला आणि अष्टमीत दहीहंडी फोडायला भाग पाडले.आजच्या बेरोजगारीचे कारण मागच्या जन्माचे पाप आहे म्हणून या जन्मी भरपूर भक्ती करा अशा भाकड,खोट्या कथा बहुजनांच्या डोक्यात घुसविल्या आणि देशातील बहुजन तरुणांचे मेंदू नासविले.महात्मा फुलेंचे ‘ब्राह्मणांचे कसब’ आणि दिनकर जवळकरांचे ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकांत सविस्तर लिहिलेआहे. प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात ही सविस्तर पणे कर्मकांडे विरोधात अतिशय परखडपणे लिहिले आहे. हि तीन पुस्तके जरूर वाचावी. वाचाल तर वाचाल,शिकाल तर टिकाल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत