महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
संपूर्ण विश्वातील एकमेव ज्ञानसूर्याची जयंती

अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण जगात ज्या जयंतीचे आतुरतेने वाट पाहीली जाते आणि ती जयंती युनो सुद्धा साजरी करते अशी ही जयंती म्हणजे भीमजयंती.
हीच भीमजयंती महाराष्ट्रात, भारतात ही जयंती पाहिजे व्हा प्रमाणात साजरी होताना येते काय? गेल्या चार वर्षांपासून जयंती कशी साजरी करावी यासाठी मी अनेक ग्रृपवर लेख लिहिले, चर्चा केली या अनुषंगाने माझी काल्पनिक कथा जयंती अतिशय गाजली, अनेकांनी, वृत्तपत्रांनी तिचे स्वागत केले.
आज पुन्हा माझ्या मनातील. जयंती विषयावर मत मांडणार आहे, पटत असेल तर अंमलबजावणी करावी,नाही तर हा विषय सोडून द्या जबरदस्ती नाही.
संपूर्ण विश्वातील एकमेव ज्ञानसूर्याची जयंती त्यांच्या विचारांना मारक ठरेल अशी जयंती आज साजरी होताना दिसून येते,ज्या महामानवाने आमचें संपूर्ण जीवन बदलून टाकले, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, विचार करण्याची शक्ती दिली अशा शील, चारित्र्य, नीती मत्ता, प्रामाणिक असणाऱ्या महामानवाच्या आजच्या जयंतीचे स्वरूप कसे आहे? किरकोळ स्वरूपात सोडले तर बहुतांश प्रमाणात या महामानवाची जयंती साजरी करतात की, त्यांच्या त्यांच्या विचारांना, कार्याला कशी मारक ठरेल अशी जयंती आपण साजरी करत नाही काय? बेहोश, बेधुंद होऊन अंगविक्षेप करणे, मद्यधुंद होवून डीजेवर नाचणं म्हणजे जयंती साजरी करणे आहे काय? यासाठी आम्ही ५०० रुपयांपासून ५००० पर्यंत वर्गणी काय म्हणून द्यावी?
माझ्या मते जयंती पूर्ण आठवडा साजरी करावी,हि जयंती दिनांक ७ तारखेपासून १४ तारखेपर्यंत घ्यावी.दिनाकं सात तारखेला मुलामुलींसाठी, महिलेसाठी विविध खेळांचे आयोजन करावे, दिनांक आठला सर्व गटांसाठी निबंध स्पर्धा, दिनांक ९ ला सर्व गटांसाठी वक्तृत्व स्पर्धा ठेवावी, दिनांक १० ला शासनाच्या विविध योजनांची माहिती तरुण तरुणी यांना द्यावे, दिनांक ११ला राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम, त्यांच्या कार्याची माहिती द्यावी दिनांक १२ ला सम्राट अशोक यांची जयंती आणि मेंदी स्पर्धा घ्यावी, दिनांक १३ ला रांगोळी स्पर्धा, रोषणाई करावी. १४एप्रिला वंदना आपल्या गल्लीतील लोकांकडून जयंती निमित्त मनोगत घ्यावे, तसेच सायंकाळी मिरवणूक डीजे न वापरता काढावी.
यानंतर आपल्या सोयीनुसार एक दिवस प्रबोधनात्मक व्याख्यान किंवा गाण्याचा कार्यक्रम ठेवावा,हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ज्या विविध स्पर्धा घेतल्या त्याचे बक्षीस वितरण करावे, या विविध उपक्रमात कधी १८ तास अभ्यास घ्यावा. वक्ता बोलवित असताना आपल्या जिल्ह्यातीलच बोलवावा त्याला मानधन जास्तीत जास्त ५०००/- पर्यंतच द्यावे, आर्कष्टा,गायन पार्टी बोलवायचे असेल तर ते सुद्धा आपल्या जिल्ह्यातील आणि मानधन जास्तीत जास्त २५ ते ३० हजारांपर्यंत खर्च करावे.
शिल्लक राहिलेल्या पैशात आपल्या गल्लीतील गरीब, हुशार विद्यार्थ्यांना मदत करणे, चारित्र्य संपन्न गरीब कुटुंबाला,मदत करणे किंवा आपल्या गल्लीत कशाची कमतरता आहे उदा उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते अशा वेळी बोर खोदणे यांसारखे समाज उपयोगी विविध उपक्रम आपण जयंतीच्या काळात राबू शकतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे पर्यावरण जपणारे होते म्हणून बाईक रॅली, फटाके फोडून हवा दूषित करु नये,बीजे न वापरल्याने ध्वनी प्रदुषण होणार नाही , शिल्लक पैशात समाज उपयोगी विविध कार्य कसे करता येईल याकडे लक्ष देवून जयंती साजरी करण्यात यावी असे माझे वैयक्तिक मत आहे. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे जयंती निमित्त आपण जे बॅनर काढतो त्या बॅनर वर विश्वरत्न, युगप्रवर्तक, बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही जयंती कार्यकारिणीचा किंवा इतर सदस्याचा फोटो वापरु नये, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रबोधनात्मक विचारांची व्हावी , जेणेकरून नवीन पिढीला काही आदर्श मिळेल.
या विविध कार्यक्रमांचे नियोजन करताना जयंती मंडळ फैरफार करून इतर सामाजिक उपक्रम राबवू शकतात, अशा तऱ्हेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर जयंती साजरी केली तर आपल्याकडे बघण्याचा इतर समाजाच दृष्टीकोन बदलेल,आपला एकोपा दिसून येईल.
आणि हो जयंती साजरी करताना इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून, मनुवादी संस्कृती मानणा-या लोकांकडून वर्गणी घेऊन साजरी करु नये,ज्या महापुरुषाने आपल्याला लाचारी सोडून स्वाभिमान शिकवला अशीच स्वाभिमानी जयंती आपण साजरी केली पाहिजे, असे माझे वैयक्तिक परंतु ठाम मत आहे.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याख्याते, नांदेड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत