मुख्यपानविचारपीठ

मी जय भीम वाला.

राजू भगत
हिंगणघाट ९८२२४९०४४३

मी जय भीमवाला काँग्रेसमध्ये काम करतो,मी जय भीमवाला बी.जे.पी.मध्ये काम करतो, मी जय भीम वाला राष्ट्रवादीमध्ये काम करतो,मी जय भीमवाला शिवसेनेमध्ये काम करतो.मी जय भीमवाला म.न.से.मध्ये काम करतो…अरे खरा भीम सैनिक इकडे तिकडे जाऊच कसा शकतो आपल्या बापाच काम सोडून दुसरीकडे धावूच कसा शकतो….आपल्या स्वतःच्या बापाला बाप म्हणन सोडून तुम्ही बाजूच्याला बाप म्हणता काय.मग आपले स्वतःचे आंबेडकरी पक्ष आणि आपला आंबेडकरी समाज सोडून तुम्ही इकडे तिकडे जाताच कसे काय.बर काँग्रेसवाले आम्हाला कधी मतदान करतात काय? बि.जे.पी.वाले आम्हाला कधी मतदान करतात ‌काय, शिवसेनेवाले आम्हाला कधी मतदान करतात ‌काय.कधी या पक्षाचे लोक आंबेडकरी पक्षाचे सभासद बनले का,या पक्षाच्या लोकांनी कधी आंबेडकरी पक्षामध्ये प्रवेश केला का.मग तुम्ही जाणारे चू## आहात का.आपलं स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरच्या ऊष्टी भांडी घासून खरकट खाण्याची सवय आमच्यातील पुष्कळशा काही लोकांना लागलेली आहे.आज जरी आमची झोपडी असली तरी मी माझ्या झोपडीला मी आपल्या मेहनतीने स्वाभिमानाने एक सुंदर असा बंगला ऐक सुंदर अशी बाग करुन दाखवील.कारण ती माझ्या बापाने स्वाभिमानाने उभी केलेली एक मजबूत अशी प्रेरणादायी वास्तु व ऐक स्वाभिमानी अनमोल खजिना आहे.या गोष्टीचे भान का नाही आम्हाला.आम्हचे कीतीही वादविवाद मतभेद असले तरी आखरी सत्य हेच आहे की,आम्हा सगळ्यांना ऐकत्र मिळून लढायचे आहे.कारण या ७५ वर्षांमध्ये आम्हाला अन्य कोणत्याही समाजाचा पाठिंबा मिळाला नाही.म्हणून आम्हच आम्हालाच बघून घ्यायच आहे.दुसरीकडे कुठेही शेण खायला जायचे नाही.ही भुमीका आम्ही लोकांनी ठेवायला पाहिजे होती.आम्ही ऐका बापाचे ऐका रक्ताचे ऐका बौध्द समाजाचे असतांनी सुद्धा ऐक नाही झालो.आज आम्हच्याकडे इतक काही असतांनी सुद्धा आमच्याकडे बाबासाहेबांचे इतके महान विचार असतांनी सुद्धा.आज आमच्याच आंबेडकरी समाजातील काही भिकारचोट त्यांच्या दाट्टयात जाऊन भीक मागत असतात.आज आम्ही बाबासाहेबांचे नाही झालो. परंतू काँग्रेस बी.जे.पी. शिवसेना म.न.से‌ सारख्या पक्षाचे मात्र कट्टर समर्थक कट्टर अनुयायी व कट्टर कार्यकर्ते झालो.वारे मेरे बाबा के बच्चो सही मे कमाल कर दिखाया आपने.आंबेडकरी समाजामध्ये फीरत असताना सांगता की मी बाबासाहेबांचा सैनिक आहे.निवडणुका आल्या की बाबासाहेबांच्या विचारांशी पलटी मारता.जे बौध्द झाले ते आज पण बाबासाहेबांचेच अणुयायी आहेत.आणि जे आज पण महारच आहेत.ते बि.जे.पी.चे.आर.एस.एस.चे.मोदीचे,काँग्रेसचे शिवसेनेचे ब्राह्मणवादी पक्षाचे अणुयायी आहेत असे मी समजतो.नाव आंबेडकरी समाजाच घेता.विचार बाबासाहेबांचे सांगता.छाती फुगवून मी बौद्ध आहे म्हणून सांगता.आणि बाबासाहेबांचे विचार मातीत गाडणाय्रा पक्षाच्या तिकिटावरती लढता अशा पक्षाचे काम करता.आणि त्याच बाबासाहेबांच्या लेकराला मतदान मागता.कशासाठी तर निवडून आल्यावरती बाबासाहेबांचे विचार मातीत गाडण्यासाठी.धन्य हो ते बाबासाहेबांची अशी लढाई लढणारे,धन्य होत ते असे लोक,की जे अशा लोकांना साथ देतात धन्य होत ते लोक जे की अशा लोकांना मतदान करतात ‌काय बोलायच पुन्हा. काय बोलण्यासाठी ठेवल…..ज्या काँग्रेस पक्षाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जीवनभर विरोध केला.ज्या काँग्रेसनी बाबासाहेबांना ऐका विशिष्ट जातीचा नेता म्हणून प्रमोट केल.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती जाण्यास मनाई केली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती गेले नाही पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षांनी त्यावेळेस मोर्चे बांधणी केली.त्या काँग्रेस पक्षावर तुम्ही लढता त्या काँग्रेस पक्षाचे काम करता… हे आर.एस.एस. वाले हे बि.जे.पी.वाले तर सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या विरोधात आहेत.कितीतरीदा या आर.एस.एस.वाल्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चे काढले संविधानाला विरोध केला राष्ट्रध्वजाला विरोध केला लोकशाहीला विरोध केला हे जग जाहीर आहे.कीतीतरी बि.जे.पी.च्या.लोकांनी आम्ही संविधान संपविण्यासाठी सत्तेत आलो आहे असे म्हटले.बि.जे.पी.चे लोक भीमा कोरेगाव स्तंभ उघडण्याची भाषा करतात बीजेपी चे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालविल्या अशी भाषा करतात.बी.जे.पी.चे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात आरक्षण बंद करण्याची भाषा करतात.तरी पण आम्ही सुधारायला तयार नाही आहोत.या भारतीय जनता पक्षाने या नऊ वर्षांमध्ये इतका हाहाकार माजवला आहे की आज या लोकांनी संविधानिक मूल्य पायाखाली तुडवली आहे,लोकशाही पायाखाली तुडवली आहे,संविधानाला न जुमानता हुकूमशाही प्रस्थापित केली आहे, देशांमध्ये अतिशय जातीवाद पसरवला आहे.त्या बीजेपीच्या पक्षावरती तुम्ही लढता.ज्या लोकांनी जिवनभर बाबासाहेबांना छळल ज्या लोकांनी आंबेडकरवाद संपविण्याचा प्रयत्न केला.ज्या लोकांनी बाबासाहेबांचे विचार संपविण्याचे सतत प्रयत्न केले.अशा पक्षाच्या तिकिटावरती लढता अशा पक्षाचे काम करता.आज तुम्ही कीती हुशार आहेत आणि ही आम्हची आंबेडकरी जनता कीती मूर्ख आहे.असेच म्हणायचे आहे का तुम्हाला.आज आंबेडकरी समाजातील पुष्कळसे राजकारणी समाजातील आंबेडकरी जनतेला भावनिक करुन समाजातील आंबेडकरी जनतेची दिशाभूल करीत आहेत.म्हणून आंबेडकरी जनतेला मी विनंती करतो की,शांत डोक्यानी तर्क शुद्ध विचार करुन.काय बरोबर आहे,काय चुक आहे.कोण कसा आहे,कोण कसा वागतो आहे.कोण काय करतो आहे.या सगळ्या गोष्टींच निरीक्षण करून मगच आपल्या मतावरती ठाम व्हा.आणि मगच योग्य त्या व्यक्तीला मतदान करा.नाही तर हे असे लोक बौद्ध समाजाला खाईत नेल्या शिवाय राहणार नाही……टुटे जरुर है मगर बिखर नही गये‌.और घर अपना छोडकर कुछ आंबेडकरी दलालो की तह्रा.कीसी अयरे गयरे के घर नही गये.कैसा नही होगा पुरा ओ मेरे भीम का सपना‌.आज भी कुछ बाबासाहब के ओ स्वाभिमानी बच्चे मर नही गये…..काल नाही तर आज तरी तुला लाज वाटली पाहिजे.बाबासाहेबांची ती स्वाभिमानी चळवळ तुझ्या छातीत दाटली पाहिजे.तुझ्यासाठी रमा आणि त्या भिमाची चार चार लेकरं मातीत गेली भडव्या.तुला त्यांच्या त्या विचारांशी बेईमानी करतांनी थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे….विद्रोही..राजू भगत. हिंगणघाट जिल्हा वर्धा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!