गर्भलिंग निदान कायदा उल्लंघन प्रकरणी डॉक्टरला १ वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा

गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक – पीसीपीएनडीटी कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी धाराशिव इथल्या एका डॉक्टरला मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस.भदाणे यांनी एक वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सल्लागार समिती आणि पीसीपीएनडीटी दक्षता समिती पथकामार्फत तपासणीत सदर डॉक्टर दोषी आढळून आला होता. गर्भलिंग निदान करणाऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस राज्य शासनाकडून खबरी योजनेअंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येतं. यासंदर्भातली माहिती एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार चार सात पाच, या क्रमांकावर कळवावी, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत