शहरातील 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन.

मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आळशीपणा वाढत असल्याचं कारण म्हणजे सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचं व्यसन. सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर मुलं सर्वाधिक वेळ वाया घालवत आहेत. लोकल सर्कल्स नावाच्या संस्थेने यावर सर्वेक्षणात अकेलं आहे, की शहरी भागातील 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे. या सर्वेक्षणात 296 जिल्ह्यांतील सुमारे 46,000 पेक्षा अधिक पालकांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यातील 61 टक्के पालकांनी सांगितलं, की त्यांची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात. यातील बहुतांश वेळ हा गेमिंग किंवा सोशल मीडियावर जातो. 39 टक्के पालकांनी सांगितलं, की त्यांची मुलं 1 ते 3 तास मोबाईल घेऊन बसतात. 46 टक्के पालकांनी हे प्रमाण 3-6 तास असल्याचं सांगितलं, तर 15 टक्के पालकांनी हे प्रमाण 6 तासांहून अधिक असल्याचं सांगितलं.
या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 73 टक्के पालकांनी म्हटलं, की डेटा संरक्षण कायद्यामध्ये या समस्येबाबत तरतूद हवी. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया, ओटीटी किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पालकांची परवानगी घेणं बंधनकारक करायला हवं, अशी मागणी पालकांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत