
जगातील सर्व नारीला शक्ती असती तर आपल्याच देशातील स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाला आहे त्यावेळी नारी शक्ती कुठे होती ? अनेक स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले, हत्या करण्यात आली, आताच काही महिन्यांपूर्वी मणिपूर मध्ये स्त्रीयांची नग्न धींड काढली होती, त्यावेळी नारी शक्ती कुठे होती ? देशातील युवतींनी ओलम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले होते, त्यांच्यावर एका बीजेपी च्या ब्रजभुषण सरणसिंग ने विनयभंग केला होता त्यावेळी नारी शक्ती कुठे होती ? महाप्रजापतीने कोणती नारी शक्ती दाखवली होती ? नारी शक्ती तेव्हाच निर्माण होते जेव्हा राज्यघटना त्यांना संरक्षण देते. परंतु सत्ताधारी जर त्या राज्यघटनेत दिलेले अधिकाराची अंमलबजावणी करीत नसेल तर नारी शक्ती काय करणार ? राज्यघटनेत सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत तरीही त्यांच्यावर पुरूष सत्ता का गाजवितो ! जोपर्यंत पुरूष प्रधान सत्ता असेल तोपर्यंत नारी शक्ती फक्त एक दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यापुरती मर्यादित आहे. आजही स्त्री रात्री कुठेही एकटी जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
खरोखरच नारी हीच जीवनात अनंत अडचणींवर मात करून स्वतः आणि संपूर्ण कुटुंबाला सांभाळून जीवन जगत असते, परंतु नारीला खरा सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. ज्यांनी युद्धात भाग घेतला, त्यांना वगळता कुठेही नारी शक्ती दिसून येत नाही. क्रांती ज्योती सावित्रीबाई, माता रमाई ह्यांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या आणि फारच दुःखद स्थितीत मरण पत्करावे लागले. ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन उंच भरारी घेतली अशा किती असेल ? फार तर बोटावर मोजता येतील. खरं म्हणजे पुरूष नारी शक्तीला समान समजतच नाही. म्हणूनच बुद्धाने सुद्धा महाप्रजापती आणि तिच्या सोबत आलेल्या ५०० स्त्रीयांना संघात सामील करून घेण्यासाठी आठ अटी ठेवल्या होत्या. त्या भिक्षुणी झाल्यावर कोणती शक्ती दाखवली ? नारीला जर कोणी शक्ती प्रदान केली असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ! नाही तर त्यांच्या नशिबी चूल आणि मूल ह्याशिवाय काय होते ? एवढेच नाही तर पतीचा मृत्यू झाला तर त्यांना इच्छा नसतानाही सती जावे लागत होते. तेव्हा कुठे होती नारी शक्ती ?
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
8.3.24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत