
गेल्या काही महिन्यांपासून सफरचंदाच्या भावात मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आज सपशेलपणे गडगडले आहेत. आधी किलोला १०० रुपये मिळणार भाव आज कॅरेटला मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
एक महिन्यापूर्वी बाजारात किलो मागे दोनशे पार केलेल्या टोमॅटोच्या भावामध्ये मोठी पडझड झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना कॅरेटमागे शंभर रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. दरम्यान, शेतकऱ्यांनी टोमॅटोला आग लावून ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
एप्रिल महिन्यापासून बाजार टोमॅटोने शंभरी पार केली आहे. मुंबई, दिल्लीसारख्या शहरातील बाजारपेठत तर २०० रुपयांवर पोहोचले होते. टोमॅटोचे भाव नियंत्रण करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करत टोमॅटोची खरेदी करायला सुरुवात केली. दरम्यान, नाशिक, लातूर, नारायणगावसारख्या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅट्याची लागवड केली. गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने बाजारापेठेत भाव पडले.
राज्यातून देशातील सर्वच ठिकाणी त्यात हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका यासारख्या भागात टोमॅटो पाठवले जात असतात. परंतु बाजारात टोमॅटोचे दर पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति कॅरेट ८० ते १०० रुपये भाव मिळत आहे. त्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत