महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणशैक्षणिक

सावित्रीमाईचा आदर्श डोळ्या समोर ठेवून विद्यार्थीनींनी शिक्षणासाठी लढा द्यावा :- गटशिक्षणाधिकारी इनामदार


दादासाहेब बनसोडे

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे सामाजिकदृष्ट्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय गरीब कुटुंबातील विद्यार्थीनीं जिल्हा कन्या परिषद प्रशालेत शिक्षण घेत आसुन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षक शिक्षीकानी प्रमाणिक प्रयत्न करावा या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी या सर्व गोष्टींचा विचार करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षणाचे धडे घ्यावेत आसे प्रतिपादन तुळजापूर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी मेहरुनिसा इनामदार यांनी केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मनिषा खारवे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे कोंडाबाई गायकवाड प्रा डॉ पांडुरंग पोळे , पत्रकार दादासाहेब बनसोडे , सामाजिक कार्यकर्त्या उषाताई लोखंडे अदिजन होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचा वार्षिक अहवाल वाचन शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांनी केले यावेळी प्रा डॉ पांडुरंग पोळे , दादासाहेब बनसोडे यांनी आपपले मनोगत व्यक्त केले .
प्रथमता वार्षिक स्नेह संम्मेलन उदघाटन प्रसंग्गी माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर स्नेह सम्मेलनाला सुरवात करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सत्कार करण्यात आला . या वार्षिक स्नेह सम्मेलना अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला निर्भीड पणे आपली कला सादर केली .
जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड सह शिक्षीका निर्मला गावित , लिलावती कौरव , मिलींद कुलकर्णी , दत्तात्रय सगर , केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव , हारुण अत्तार , अश्विनी साळुंखे , शिपाई रंजना हळदे , पोषण आहार मदत निस सिंधु थोरात आदिजन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले . स्नेह सम्मलनाच्य कार्यक्रमास विद्यार्थांनीच्या कला गुणाना दाद देत पालकांनी मनमुराद आनंद लुटला पालक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!