भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

भगवान बुद्धांची शिकवण भाग ५२

बौद्ध जीवनमार्गमागील भागात ‘सत्, असत् आणि पाप,’ लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष’याबाबतीत माहिती घेतली. या भागात ‘क्रोध आणि वैर आणि ‘मनुष्याचे मन आणि मनोविकार’ याबाबतीत माहिती घेणार आहोत.क्रोध आणि वैरमनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. क्रोधाग्नीे शांत करा. हाच बौद्ध जीवनमार्ग आहे.माणसाने क्रोधाला प्रेमाने जिंकावे, दुष्टपणाला चांगुलपणाने जिंकावे, लोभाला दिलदारपणाने, दानशीलतेने जिंकावे व असत्याला सत्याने जिंकावे.द्वेषाने द्वेष कधीही शांत होत नाही. प्रेमानेच तो शांत होतो; हा प्राचीन नियम आहे.”तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले.” असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो.क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा; येणेप्रमाणे जो नामरुपाविषयी (name and form) अनासक्त असतो, कशालाही ‘माझे माझे’ म्हणत नाही, असा अपरिग्रही दुःख भोगत नाही.विजयामुळे वैर वाढते (conquest begets enmity), पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो; परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत मनुष्य सुखाने झोप घेतो.कामाग्नीसारखा (lust) अग्नी नाही आणि द्वेषासारखे (hatred) दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे (constituents of existence) दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठी सुख-शांती नाही.मनुष्याचे मन आणि मनोविकार मन घडविते तसा मनुष्य होतो. जे सत् आहे, कुशल आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, हेच बौद्ध जीवनमार्गाची मुख्य शिकवणूक आहे.मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मन:प्रधान आहेत. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलत किंवा वागत असेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर चांगल्या चित्ताने बोलत किंवा वागत असेल तर कधीही न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते.मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण तयार करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान माणूस मनाला एकाग्र व सरळ करतो.पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते, त्याप्रमाणे माराच्या, विकारांच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकूळ असते.ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते.ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रूप्यातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा, वेळोवेळी नाहीसा करतो.लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म (अकुशल कर्म) त्याला दुर्गतीकडे नेत असते.सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा.जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाचे जीवन सोपे आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र-अपवित्र याचा विचार करतो. अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे अशा बुद्धिमान मनुष्याला जीवन कठीण आहे.जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परस्रीकडे जातो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो. तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो.म्हणून लक्षात ठेवावे की, संयमहीनांची स्थिती चांगली नव्हे. (unrestrained are in a bad state); लोभ (greediness)आणि पापकर्म चिरकाल दुःखात लोटणारे असते. म्हणून काळजी घ्यावी.जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते.कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा वादळी प्रवाह नाही. परदोष हे सहज दिसतात. परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो.जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहातो.अकुशल कर्मापासून (पापापासून) दूर राहा. स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, हीच भगवान बुद्धांची शिकवण आहे.संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड चवथा भाग तिसराक्रमशः आर.के.जुमळेदि.३.२.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!