
मुंबईच्या नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. स्वदेशी बनावटीची, अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज ‘इम्फाळ विनाशिका’ आज भारतीय नौदलात समाविष्ट होत आहे. बंदर आणि समुद्रात कठोर आणि सर्वसमावेशक चाचणी घेतल्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.या युद्धनौकेची लांबी १६३ मीटर तर वजन ७ हजार ४०० टन आहे. ईशान्येतल्या राज्यांमधल्या शहराचं नाव देण्यात आलेली इम्फाळ ही पहिली युद्धनौका आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मणिपूरचं बलिदान आणि योगदान लक्षात घेऊन या युद्धनौकेला इम्फाळ हे नाव देण्यात आलं आहे. नौदलात सहभागी होण्यापूर्वी ब्रह्मोस ची चाचणी यशस्वी केलेली ही पहिली युद्धनौकाआहे.पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर आणि हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र या जहाजावर आहेत. INS ची निर्मिती आणि चाचण्यांसाठी लागलेला वेळ हा देशांतर्गत निर्मित कुठल्याही विनाशिकेसाठी लागलेला सर्वात कमी वेळ आहे. इंफाळ युद्धनौकेचा नौदलात समावेश ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला आणखी बळकटी मिळणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत