NCCच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात बावीसशेहून अधिक छात्र

महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात यावर्षी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील एकंदर २ हजार २७४ छात्रांचा सहभाग आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या अर्थात NCC च्या २०२४ च्या प्रजासत्ताकदिन शिबिराला काल दिल्लीतल्या करिअप्पा परेड मैदानावर सर्व धर्म पूजा होऊन सुरूवात झाली. शिबिरातल्या सहभागींमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील १२२ तर ईशान्य विभागातील १७१ छात्र आहेत. यंदाच्या शिबिरात ९०७ मुली सहभागी झाल्या असून ही त्यांची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. शिवाय युवक देवाणघेवाण कार्यक्रमाअंतर्गत या शिबिरात अर्जेंटिना, कझाकस्तान, बोस्टवाना, भूतान, ब्राझील, झेक रिपब्लिक, फिजी वगैरे २५ मित्र देशांमधील छात्र व अधिकारी देखील सहभागी होणार संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत