
पंजाब,हरियाणा,चंदीगड, उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये सुरु असलेली थंडीची लाट कायम राहील. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या पाच दिवसांत या भागात दाट धुक्याची चादर पसरलेलीच राहणार आहे. पंजाब,हरियाणा तसंच दिल्ली मधल्या बहुतांश भागात २ ते ५ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद असून हरयाणाच्या हिसार मध्ये १ पूर्णांक १ अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवलं गेलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत