खासगी रुग्णालयात एसीमुळे गारठून दोन नवजात बालकांचा मृत्यू; डॉक्टरच्या विरोधात अनावधानाने झालेल्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला लागून असलेल्या शामली जिल्ह्यातील कैराना भागात एका खाजगी दवाखान्यात दाखल असलेल्या दोन नवजात बालकांचा रविवारी एअर कंडिशनरच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.
कैराना पोलिस स्टेशनचे प्रभारी नेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, मृत मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे डॉ. नीतू यांच्या विरोधात अनावधानाने झालेल्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्वनी शर्मा यांनी रविवारी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत