दिनविशेष – 29 एप्रिल

आज दि. २९ एप्रिल २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, चंदवारो, चेत मासो, सोमवार, चैत्र माहे.
२९ एप्रिल १९२९ – रोजी दामोदर गृह परळ येथे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरविण्यात येऊन “कामगारांनी संपावर जाणे योग्य नाही.” असा ठराव संमत करण्यात आला.
२९ एप्रिल १९३३ – रोजी अनागरिक धंम्मपाल स्मृतिदिन.
२९ एप्रिल १९३३ – रोजी जनता वृत्तपत्रात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोपारा, वसई येथील झालेल्या भाषणाचा वृत्तान्त प्रसिद्ध. त्यांनी सांगितले होते की, “बुद्धीचा उपयोग भाकर, शिक्षण व राज्यसत्ता मिळविण्यासाठी करायला हवा.”
२९ एप्रिल १९४४ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘दी शेड्युल्ड कास्टस इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट’ ची मुंबईत स्थापना केली. या संस्थेचे खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते.
२९ एप्रिल १९४४ – रोजी कोडमा येथे खाण अभ्रक परिषदेचे अध्यक्ष म्हणून विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण करतांना, अभ्रक उद्योगाला भक्कम पायावर उभे करण्याचा मानस व्यक्त केला.
२९ एप्रिल १९४७ – रोजी भारतीय संसदेने भारतीय राज्यघटनेचे अस्पृश्यता निवारण विषयीचे सतरावे कलम संमत केले.
२९ एप्रिल १९५४ – रोजी चंद्रपूर जिल्हा येथील वडसा येथे भंडारा संसद पोटनिवडणुकीच्या प्रसारासाठी आयोजित सभेला संबोधित करताना विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “आदिवासी असूनही रानटी युगातच आहेत. स्वातंत्र्याने त्यांच्या जीवनात बदल घडवून आणलेला नाही.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत