महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

किल्लारी गावात तिसऱ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

धम्मदेसना साठी जास्तीत जास्त बौद्ध उपासक व उपासकानी उपस्थित राहाण्याचे पुज्य भन्ते धम्मसार यांचे अवाहान.

तथागतांचा बुद्ध धम्म प्रचार आणी प्रसार आणी बुद्ध संस्कारांचे जतनासाठी बुद्ध संस्काराचे महत्त्व नागरीकांना प्राप्त झाले पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे कारण तथागताचा बुद्ध धम्म जन कल्याणाचा मार्ग आसून प्रत्येकानी तो अंगीकरावा आजच्या काळाची गरज आहे .
प्रत्येक गावात एक बुद्ध विहार बौद्ध संस्कारित पिढी घडविण्यासाठी तयार करणे गरजेचे आहे . यासाठीच बौध्दाचे संस्कार प्रत्येकांच्या घरी आसायला पाहिजे म्हणून
येत्या ७ जानेवारीला किल्लारी गावात खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष पुज्य भदंत डॉ उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ हे असणार आहेत तर धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ अनिलकुमार गायकवाड साहेब संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी मुंबई हे उपस्थित आसणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेंद्र पाल गौतम 22 प्रतिज्ञांचे प्रचार आणि प्रसारक व माजी समाज कल्याण मंत्री [ दिल्ली सरकार ], तर प्रमुख पाहुणे म्हणून औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार , माजी मंत्री बसवराज पाटील , आयु डॉ जी.के. डोंगरगावकर संस्थापक सचिव सत्याग्रह महाविद्यालय खारघर नवी मुंबई , डॉ करुणाताई अमित जुईकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन ,
आयु यशपाल चंद्रकांत कांबळे महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक जीएसटी विभाग पुणे , आयु अभिमन्यू कांबळे उपसंपादक लोकमत संभाजीनगर , तर स्वागताध्यक्ष म्हणून युवराज गायकवाड उपसरपंच ग्रामपंचायत किल्लारी हे असणार असून ही धम्म परिषद खूप मोठी विशाल होणार असून या धम्म परिषदेला वीस ते पंचवीस भिक्खूंच्या संघ उपस्थित राहणार आहे त्यांच्या धम्मदेशना आणि मान्यवरांना ऐकण्यासाठी आपण होऊ घातलेल्या बौद्ध धम्म परिषदेला ७ जानेवारी 2024 रोजी बौद्ध धम्म परिषदेस बौद्ध उपासक उपासिका तथा आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवहान पुज्य भन्ते धम्मसार यांनी केले आहे
ही धम्म परिषद तक्षशिला बुध्द विहार, तथागत बुध्द गार्डन, ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी येथे संपन्न होणार आहे आपण सर्वजन या बौध्द धम्म परिषदेला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित रहावे हि विनंती आसे अवहान भुज्य भदंत धम्मसार यांनी केले आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!