महाराष्ट्रमुख्यपान

16 नोव्हेंबरला वाघनखं महाराष्ट्रात येणार

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला ती वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’मध्ये आहेत. ही वाघनखं भारतात आणण्याकरता करार संपन्न झाला आहे. या करारादरम्यान, लंडनच्या रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरांत जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मंत्री उदय सामंतही उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ही वाघनखं आणली जाणार आहेत. मात्र ही वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच आणली जात आहेत अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार, ते १ ऑक्टोबर रोजी ब्रिटनला रवाना झाले. ३ ऑक्टोबर सायंकाळी त्यांनी ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासह बैठक घेऊन त्यांनी ही वाघनखे भारतात आणण्याकरता सामंजस्य करार केला आहे. १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखे भारतात दाखल होणार आहेत. या सामंजस्य करारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!