महाराष्ट्र

वेदांच्या विज्ञानभरारीवर एनसीईआरटीचे शिक्कामोर्तब

चंद्रयान-३’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पुस्तिका प्रकाशित केली आहे. यामध्ये देवी-देवतांच्या रथांपासून ते रावणाच्या पुष्पक विमानापर्यंत अनेक ‘शोधां’चा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आता संशोधनाला पुराणांचे संदर्भ जोडल्यामुळे उद्भवणाऱ्या वादांमध्ये एनसीईआरटीनेही भर घातल्याचे दिसते आहे.

गेल्या महिन्यात पार पडलेल्या चंद्रयान मोहिमेचे यश शाळा-महाविद्यालयांतून साजरे करण्याच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्या. विद्यार्थ्यांना मोहिमेची माहिती देण्यासाठी एनसीईआरटीने ही पुस्तिका अवांतर वाचनासाठी प्रकाशित केली आहेत. त्याचे अलिकडेच प्रकाशन करण्यात आले. यात वैदिक काळापासून भारतात विमाने, उडणाऱ्या वाहनांचा शोध लागला होता अशा आशयाचे उल्लेख आहेत. पुराणकाळापासून आपल्याकडे विमानांवर, हवेत उडणाऱ्या वाहनांवर संशोधन करण्यात आले होते. याचे संदर्भ ‘विमानशास्त्र’ या ग्रंथात आढळतात. वेद भारतातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. त्यात देवी-देवता रथ वापरत होते आणि ते रथ उडू शकत होते, असे उल्लेख आहेत. उडणारे रथ आणि विमाने यांचे उल्लेख स्वतंत्रपणे करण्यात आले आहेत. रथांचा वापर देव पृथ्वी, स्वर्ग, अंतराळात फिरण्यासाठी करत असत. रावणाच्या पुष्पक विमानाचा रामायणात उल्लेख आहे. विश्वकर्माने ते सूर्याच्या धुळीकणांपासून तयार केले होते, अशा आशयाचा मजकूर एका पुस्तिकेत आढळतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!