देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिक

मराठा, पटेल,जाट, लिंगायत, रेड्डी, पटनायक, द्रविड लोकच शिक्षण सम्राट कां ?

—-
१२०० ते १८१८ शिक्षण बंद होते, देशात एकही शाळा महाविद्यालय इंजिनिअर मेडिकल कॉलेज , विद्यापीठ नव्हते.इ.स.पूर्व ५०० ते इ. स. १२०० पर्यंत देशात नालंदा, तक्षशिला—- इ. २० पेक्षा जास्त विद्यापीठ होते.जगात पहिल्यांदा भारतातच शिक्षण सुरू झाले (कृपया internet वर तपासून बघा) . अमेरिकेत इ.स. तिसऱ्या शतकात शिक्षण सुरू झाले.मग प्रश्न असा पडतो की , भारत मागे कसा पडला व अमेरिका ,सर्व युरोपियन देश पूढे कसे? त्यांचे उत्तर असे की, इ.स. १२००मध्ये मुघलांच्या टोळ्या भारतात आक्रमण केले , त्यांना व भारतात सर्व प्रथम आलेल्या आर्या च्या टोळ्यांना देखील बौद्ध तत्वज्ञान मान्य नव्हते दोघांनी मिळून सर्व विद्यापीठांना आगी लावल्या.बौद्ध भिखूंच्या हत्या सुरू झाल्या,बौद्ध भिक्षू जगात इतरत्र पळून गेले.शिक्षण बंद पडले.नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ डॉ . अमर्त्य सेन व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू नी एका भाषणात सांगितले की, विद्यापीठ जाळणार्यानी जाळले नसते तर भारत जगात सर्वात जास्त श्रीमंत असता कारण सर्व शोध, संशोधन भारतातच झाले असते. अमेरिकेत शिक्षण सुरू होते म्हणून अमेरिका, जर्मनी फ्रान्स रशिया, इंग्लंड ,इटाली याच देशात सोळाव्या शतकापासून शोध संशोधन सुरू झाले, भारतात मात्र शिक्षण बंद होते,शुद्र (ओबीसी) ,अतीशुद्र (sc,st) यांना शिकेल त्याला शिक्षा होती. म्हणून भारतात शोध संशोधन सुरू झाले नाही . म्हणून भारत सर्वात गरीब आहे , म्हणून भारतातील बहूजन समाज गरीब आहे, मुघल शाहीत, निजामशाही आदिलशाही कुतुबशाही हे लोकांना लुटून राज्य केले, श्रीमंत झाले, व त्यांचे सहकारी व त्यांचे कडे दलाली करणारे श्रीमंत झाले कारण मुघलांचे, निजामशाही आदिलशाही कुतुबशाही चे प्रशासन करणार्या लोकांना ते राजे लोक पगार म्हणून जमीन देत असत.म्हणून बहुजन समाज भूमिहीन शेतमजूर, झाले.बहूजन समाजाच्या लोकांची, स्त्रिया ची गुलाम म्हणून विक्री केली जात होती. १७५७ ला scलोकांनी इंग्रजांचे सैनिक म्हणून काम करुन मुघलांचा पराभव केला सरकार ब्रिटिशांचे आले म्हणून ब्रिटिशांनी प. बंगाल ,मद्रास, केरळ प्रांतात शाळा महाविद्यालय इंजिनिअर मेडिकल कॉलेज सुरू केले.पण प. भारतात पेशवाई होती ,शिक्षणास बंदी होती,शिकेल त्याला शिक्षा होती.१८१८ला भिमा कोरेगाव यद्धामुळे scलोकामुळे पेशवाई संपुष्टात आली सरकार ब्रिटिशांचे आले.ब्रिटीशांनी १८१८ ला मुंबई, गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यांत शाळा महाविद्यालय इंजिनिअर मेडिकल कॉलेज सुरू केले, म्हणून आज ओबीसी शिक्षण घेत आहेत. ओबीसी मराठ्यांनी हा इतिहास तपासून बघत नाही,जे बघतात ते इतरांना सांगत नाही,जे सांगणारे आहेत त्यांचे ऐकायचे नाही ,फक्त मंदिरात जाऊन टाळ कुटायचे, व ज्यांच्यामुळे शिक्षण सुरू झाले त्यांच्याच विरोधात बोलायचे , त्यांच्याच पक्षाना विरोध करायचे व ज्यांच्यामुळे शिक्षण बंद होते त्यांनाच मतदान करून सत्तेवर बसवायचे इतकेच काम आहे. त्याचा परिणाम असा झाला की, आज १००%सरकारी नौकर्या बंद झाल्या आहेत.ओबीसी, एससी एसटी कडून कमी पैशात काम करवून घेण्यासाठी खाजगीकरण केले आहे ,मुठभर लोकांना श्रीमंत करण्यासाठी उदारीकरण केले आहे. १८१९ ला ब्रिटिशांनी देशात निवडणुकीने सर्व जातीच्या लोकांना निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला म्हणून ब्राम्हणांना कोणीही हिंदू मतदान करणार नाही म्हणून स्वतः ला हिंदू म्हणवून घेत हिंदू ची मते मिळविण्यात यशस्वी झाले. १९३२ नंतर गांधी नी कांग्रेस ला हिंदू नी मतदान करावे म्हणून प्रत्येक राज्यातील मोठ्या समुहाला का़ग्रेसमध्ये ओढणे सुरू केले. देशाची सूत्रे ब्राम्हण बनिया पर्शियन कडे व राज्यातील सत्ता मोठ्या समुहाकडे असे डावपेच आखले मात्र राज्याला अधिकार शून्य. १९४७ला ब्रिटिश निघून गेले, ब्रिटिशांनी आणलेले सर्व कारखाने ब्राम्हण बनिया पर्शियन या लोकांनी ताब्यात घेतले, पाकिस्तान बांग्लादेशात अफगाणिस्तान या देशातील सर्व कारखाने मुस्लीमांनी ताब्यात घेतले , ओबीसी मात्र टाळ कुटत बसले व आजही तेच करीत आहेत. १९५२ पासून निवडणूका सुरू झाल्या ,देशाची सत्ता ब्राम्हण बनिया ठाकूर, पर्शियन लोकांकडे व राज्यातील सत्ता मोठ्या समुहाकडे म्हणून आज मराठा, जाट , ठाकूर राजपूत, रेड्डी यादव लि़गायत, द्रविड पटनायक लोकांकडे शिक्षण संस्था आहेत .शिक्षण ब्रिटिशांमुळे म्हणजे sc,st लोका़मुळे सुरू झाले ,शिक्षण सम्राट मात्र मराठा, पटेल जाट लिंगायत रेड्डी यादव बणले. दलालांची स़पत्ती वाढत जाते मात्र प्रत्येक सरकारी कार्यालयात लिहिले असते की, दलाला पासून सावधान . मात्र ओबीसींनी याकडे दुर्लक्ष केले त्याचे परिणाम आजचे शिकलेले विद्यार्थी भोगत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!