
बरे झाले सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती भुषण गवई यांना जोडा फेकून मारला.हा फेकलेला जोडा लोकशाहीवर फेकला आहे.
यामुळे मनुवादी ब्राम्हणी सनातनी धर्म म्हणून मिरवणाऱ्यांची लायकी जगाला कळाली. तसेच मनुवाद्यांच्या मनात जातीय तिरस्कार काय असतो ते साऱ्या जगाने पाहिले.पण बिचारा हिंदू धर्म जगात बदनाम झाला. मनुस्मृतीचा मनुवादी ब्राम्हणी धर्म हा नितीभ्रष्ठ लोकांचा धर्म आहे.हे या कृत्याने जगाला दाखवून दिले.यापुर्वी चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यात या मनुवादी पेशव्यांनी आपला नितीभ्रष्ठ धर्म जगाला दाखवून दिला होता.या मनुवादी ब्राम्हणी धर्मामुळे संतांचा हिंदू धर्म आचरण करणारे लोक ब्राम्हणी मनुस्मृती मुळे जनावरासारखा वागू लागला आहे. २०१४ पासून जातीयता;विषमता; भेदाभेद; उच्च निचता; जातीय तिरस्कार यांचा संसर्ग करोना सारखा झपाट्याने देशात वाढला. जाती जातीत वैर म्हणजे मनुवादी ब्राम्हणी व्यवस्थेचे बहुजन समाजावर राज्य.जे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी मोडून काढले होते.म्हणजे पेशव्यांची दादागिरी मोडून काढली होती.हिंदूची मजबूरी ही आहे की; त्यांना सत्य इतिहास माहीत नाही.लबाड; खोटारडया;कपटी; कारस्थानी लोकांनी धर्माच्या फेकलेल्या जाळ्यात अलगदपणे अडकून जसा कोष्टी स्वतः स्वतःच्या जाळ्यात स्वतः अडकून जातो.तसे हिंदूंचे झाले आहे.मनुस्मृतीचा मनुवादी सनातनी ब्राम्हणी धर्म हा हिंदूचा सत्यानाश करणारा; त्यांना गुलाम करणारा; त्यांचे हक्क; अधिकार; स्वातंत्र्य पायदळी तुडवणारा धर्म हिंदू समाज डोक्यावर घेऊन नाचत आहे.हिंदुच्या आयुष्यात महागाईच्या नावाखाली लुट करून बरबादी सुरू आहे.स्मार्ट सीटीच्या नावाखाली हातावर पोट भरणाऱ्या मागासवर्गीय हिंदूना जे फुटपाथवर धंदा करत होते त्यांना फुकटची बोंब ठोकून सांगण्यात आले की; आपल्याला मुसलमान यांचा धंदा उध्वस्त करायचा आहे.मागासवर्गीय हिंदूना प्रश्न आहे की; काय तुम्हाला असे खोटे सांगून उच्च जातीच्या हिंदूनी उध्वस्त केले नाही काय? ठेकेदारी लागु करून गरीब करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. संविधानाने मागासवर्गीय हिंदूंना दिलेले आरक्षण उच्च जातीची मनुवादी व्यवस्था उद्धवस्त करत आहे. सरकारी उद्योग नष्ट करून मागासवर्गीय हिंदूंच्या नोकऱ्या हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी ( उच्च जातीच्या हिंदूनी ) नष्ट केल्या आहेत.शाळा बंद करून या धर्मांध ठेकेदारांनी मागासवर्गीय हिंदूचे शिक्षण बंद केले आहे. जाती जातीत भांडण लावून समाजातील स्वास्थ मनुस्मृतीच्या मनुवादी ब्राम्हणी व्यवस्थेने बिघडलेले आहे. मागासवर्गीय हिंदू स्त्रीयांवर दिवसा ढवळ्या बलात्कार अन्याय; अत्याचार; पिळवणूक सुरू आहे. २०१४ पासून लहान मुलींवर मनुवादी सैतान बलात्कार राजरोसपणे करत आहेत.
मागासवर्गीय हिंदूंनो मनुस्मृतीचा मनुवादी ब्राम्हणी धर्माचा झेंडा घेऊन बेहोश होऊन स्वतःच्या बरबादीचा कार्यक्रम करत आहात त्या करिता आपणास शुभेच्छा.
म्हणतात ना कु-हाडीचा दांडा गोतास काळ.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत