कल्याणमध्ये मनसेला मोठं खिंडार.

कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंना मोठा धक्का बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके, महिला विभाग अध्यक्ष शहर शितल लोके आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण-डोंबिवली परिसरात न्यायालयीन लढाई लढणारे अॅड. सुहास तेलंग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी आणि ते ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात काम करतायत, ते पाहून दरदिवशी मोठ्या संख्येनं नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आमचे नेते आणि मुख्यमंत्री दिवसातील १६-१६ तास काम करत आहेत. जनतेसाठी झटत आहेत, हे लोकांना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत