महाआघाडीने हुकुमशाही मान्य करू नये.

शिवराम पाटील
शरद पवार, उद्धव ठाकरे,नाना पटोले कितीही डायलॉग फेकत असले तरीही त्यातील हवा निघून गेली आहे.महाराष्ट्रातील आमदार मतदारांनी नाही,सरकारने निवडले आहेत.ईव्हिएम हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.निवडणुक आयुक्त आणि मुख्य न्यायाधीश सरकारचे पेड सर्व्हंट आहेत.त्यांना स्वताचे स्वत्व आणि आस्तित्व उरलेले नाही.सरकारची भीती आहे.फक्त टाईमपास आहे.खरी सुत्रे तर नरेंद्र मोदी कडे आहेत.ईव्हिएम नको म्हणून निवडणूक आयुक्त किंवा मुख्य न्यायाधीश कडे भांडून वेळ घालवणे आहे.तशी तजबीज मोदी सरकारने मुद्दाम करून ठेवलेली आहे.असे आज तरी निवडणूक आयुक्त आणि मुख्य न्यायाधीश यांच्या कामावरून वाटते.फक्त टाईमपास करून टेम्पो कमी करणे.आमचे द्वारपाल तुम्हाला गडाबाहेर लढवत ठेवतील,यातच गडकरींचा विजय आहे.
मतदारांनी महाआघाडीला मते दिली.पण ती ईव्हिएम मधे बदलून महायुतीकडे वळवली.हे कारस्थान न जाणणारा ,न समजणारा मुर्ख असू शकतो.त्यांचेशी वाद,संवाद करू नका.त्यांचा आणि लोकशाहीशी सुतराम संबंध नाही.सुज्ञ मतदारांचा आग्रह आहे कि, आम्ही महाआघाडी कडे विश्वास टाकून मतदान केले.पण ते आमच्या मतांचे आणि हक्काचे रक्षण करण्यास सक्षम ठरलेले नाहीत.त्यांनी त्यांचा जीव वाचवून घेतला.संपत्ती वाचवून घेतली.आणि मतदारांना वाऱ्यावर सोडले.त्यामुळे महाआघाडी मधील पक्षनेत्यांवरील विश्वास कमी झाला आहे.पवार, ठाकरे, पटोले, राहुल गांधी यांचा हावभाव,आविर्भाव,अभिनय पाहून तसे वाटते.त्यांच्या कुटुंबातील बाया माणसे आमदार खासदार बनली.म्हणून तर त्यांना मतदारांची फसवणूक बाबत काहीच वेदना, संवेदना,स्पंदने होत नाहीत.जितकी बाबा आढाव आणि प्रकाश आंबेडकर यांना झाली आहे.
आघाडी मधील नेत्यांची अपेक्षा आहे कि ईव्हिएम विरोधात मतदारांनी लढावे, जेलमध्ये जावे.कोर्ट कचेरी करावी.जर त्यातून काही चांगला बदल घडला आणि ईव्हिएम हटवले तर आम्ही आहोतच त्याचा फायदा घ्यायला.कांग्रेस,राष्ट्रवादी शिवसेना यांच्या रूदन सभा मधून तरी अशीच मानसिकता दिसते.मी अनेक नेते, उपनेते, कार्यकर्ते यांचेशी संवाद केला तर त्यातून फक्त रूदन ऐकायला मिळते.त्यात आक्रंदन,स्पंदन आढळत नाही.तुम लढो हम चुनकर आयेंगे.असा सल्ला दिला जातो.तुम लढो हम कपडे संभालते,इतकीही तयारी दिसली नाही.
मला तर अनेक नेत्यांनी सांगितले कि,हे काम आण्णा हजारेंचे आहे .ते आता का उपोषण करीत नाहीत?ते भाजप चे एजंट आहेत.कमाल आहे!जो माणूस मरायला टेकलेला आहे, त्यांनी उपोषण करावे आणि या धनदांडग्यांनी श्रीखंड, भुखंड खावेत का?
ईव्हिएम ही कांग्रेस ने आणलेली आफत आहे. प्रधानमंत्री राजीव गांधी आणि राष्ट्रपती ग्यानी झैलसींग यांनी.त्यांनी त्यावेळी यांचा दुष्परिणाम वर बुद्धी वापरली नाही,काहीच तर्क केला नाही, कोणाला विचारले नाही कि या शॉर्टकट मत मोजणीचा दुष्परिणाम काय होईल?
तर या पापातून सुटका करून घेण्यासाठी कांग्रेस ने जनतेची माफी मागितली पाहिजे.तेंव्हा आमची खात्री तरी होईल कि,यांना स्वताची चूक तरी कळली आहे.जर हे पाप केलेच आहे तर मग,निस्तारण्यासाठी सुद्धा त्यांनीच सुरूवात केली पाहिजे.नेतृत्व केले पाहिजे.पण तसे होतांना दिसत नाही.
सोनिया गांधी,राहुल गांधी,प्रियंका गांधी, खरगे साहेब,शरद पवार यांनी स्वताला जनतेचे नेते समजत असतील तर दिल्ली सोडून भारत भर सभा घेऊन ईव्हिएम विरोधात रान पेटवले पाहिजे.जसे महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, आण्णा हजारे यांनी पेटवले होते.विजय नक्कीच होईल.संगीतमय पदयात्रा काढून उपयोग होणार नाही.मुन्नाभाई एमबीबीएस होईल.
मी स्पष्ट लिहीतो,बोलतो सोनिया गांधी, राहुल गांधी,शरद पवार , उद्धव ठाकरे,नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात तुम्ही असे दहा नेते जर मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले तर आख्खा महाराष्ट्र नव्हे ,समुचा भारत तुमच्या आंदोलनात सहभागी होईन.मोदी स्वताला हुकुमशाहा समजत असले तरीही जनमताच्या दबावाखाली, आंतरराष्ट्रीय दबावाखाली आपत्कालीन लोकसभा अधिवेशन घेतील.आणि ईव्हिएम चा वापर बंद करण्याचा ठराव पास करतीलच.असा ठराव आणिबाणी हटवण्यासाठी घेतला होता.असा ठराव लोकपाल विधेयक साठी घेतला होता.असा ठराव ईव्हिएम रद्द करण्यासाठी घेतला जाणारच.घ्यावाच लागेल.
आता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पुर्ण भारत खंडात ईव्हिएम विरोधात जनमत गरम झाले आहे.सरकारी नोकर,पोलिस आणि मिलीटरी सुद्धा ईव्हिएम विरोधात तयार आहे.पोस्टल मतदानाच्या आकडेवारीवरून दिसते.भाजपमधील अनेक बुद्धिमान उच्चशिक्षित प्रामाणिक नेते ईव्हिएम विरोधात तयार आहेत.मोदींना निर्णय घ्यावाच लागेल.नाही घेतला तर त्यांची प्रधानमंत्री पदावरून उचलबांगडी होईल.अशी तयारी भाजप आणि आरएसएस ने केलेली आहे.
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
३/१२/२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत