प्रकाश पगारे अमर रहे ! दैनिक जागृत भारत तर्फे कालकथित प्रकाश पगारे यांना भावपूर्ण आदरांजली.

प्रकाश पगारे अमर रहे !
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, रिपब्लिकन कामगार नेते, दलित पॅन्थरचे राज्य सचिव प्रकाश पगारे यांचे अल्पशा आजाराने आज रात्रौ 2.30 वाजता ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे दुःखद निधन झाले.
कालकथित प्रकाश पगारे यांची अंत्ययात्रा आज गुरुवार दि.28/12/23 रोजी दुपारी 2.00 वाजता त्यांच्या राहत्या घरून नेरळ येथून निघेल.
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, पँथर चळवळ -RPI पक्ष रायगड जिल्ह्यात मजबूत करणारे, रेल्वे युनियनचे नेते नेरळचे सुपुत्र कॉम्रेड प्रकाशजी गंभीर पगारे यांनी आंबेडकरी चळवळीला दिलेलं योगदान अत्यंत मोलाच आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा 3 मुली जावई नातवंडे भाऊ भावजय पुतणे असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधी आज दुपारी 2 वाजता नेरळ येथे होईल.
दैनिक जागृत भारत तर्फे कालकथित प्रकाश पगारे यांना भावपूर्ण आदरांजली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत