देशदेश-विदेशमुख्य पानमुख्यपान

व्यावसायिक जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा संरक्षणमंत्री

INS इंफाळ ही स्वदेशी बनावटीची विनाशिका लष्करात सामावून घेण्याच्या समारंभात ते आज मुंबईत बोलत होते.व्यावसायिक जहाजांवर होत असलेले हल्ले सरकारने गांभिर्यानं घेतले असून नौदलानं देखरेख वाढवली असल्याचं त्यांनी सांगितले. केम प्लुटो आणि साई बाबा या व्यावसायिक जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिला. नौदलाच्या ताफ्यात सहभागी होण्यापूर्वीच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी झालेली इंफाळ ही पहिलीच विनाशिका आहे, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले. ईशान्येकडच्या राज्यातल्या शहराचं नाव दिलेली ही पहिलीच लढाऊ नौका आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.समुद्रात व्यावसायिक जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांवर नौदल प्रमुखांनीही चिंता व्यक्त केली आहे.१९ नोव्हेंबरपासून अशाप्रकारच्या ३० हल्ल्यांची नोंद झाली असून गेल्यावर्षी हा आकडा केवळ ४-५ होता,असं ते म्हणाले. यात पहिल्यांदाच महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र सोय केलेली आहे.अवघ्या सहा महिन्याच्या विक्रमी कालावधीत या नौकेच्या चाचण्या पूर्ण झाल्या.मुंबईतल्या माझगाव गोदीत तयार झालेल्या या नौकेतले ७५ टक्के भाग स्वदेशी बनावटीचे आहेत. यंदा झालेल्या हल्ल्यांमध्ये एकाही भारतीय जहाजावर हल्ला झालेला नसून काही जहाजांमध्ये भारतीय कर्मचारी होते.व्यावसायिक जहाजांनी विनंती केल्यावर त्यांना संरक्षण देण्याची नौदलाची तयारी असल्याचंही नौदल प्रमुखांनी स्पष्ट केले. गरीबी,प्रशासनाचा अभाव यासारख्या कारणांमुळं हे हल्ले होत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!