महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता

या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातलं एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचंही ते म्हणाले.ते आज विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत बोलत होते. विदर्भातल्या ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ कोटी ३९९ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश त्यांनी उर्जा विभागाच्या बैठकीत दिले.भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. न्याय प्रविष्ट प्रकरणांमध्ये रक्कम न्यायालयात भरावी.आदी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार असल्याने ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसंच कोराडी, पारस आणि इतर ठिकाणच्या ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी व्यवहार्यता तपासावी.असंही त्यांनी या बैठकीत सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या तीनही संचालक उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!