दिनविशेष – सोमवार दिनांक 13 मे 2024

आज दि. १३ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, चंदवारो, वेसाख मासो, सोमवार, वैशाख माहे.
१३ मे १९२० – रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र.
*१३ मे १९२० – रोजी नांदगाव येथे श्री सोमवंशी मेळाव्यात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण.
१३ मे १९३८ – दिनांक १३ मे ते २१ मेच्या दरम्यान विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोकण प्रांताचा दौरा करून ठीक ठिकाणी आयोजित सभेत भाषणे केलीत. खोती पद्धत नष्ट करण्यात अस्पृश्य वर्गांचे कसे हित आहे हे पटवून सांगितले.
१३ मे १९५२ – रोजी राज्यसभेचे सदस्य म्हणून विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शपथविधी संप्पंन्न झाला. तसेच प्रिव्हीलेज कमिटीत निवड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत