महाविद्यालयांत आता कमी कालावधीचे कौशल्य विकास अभ्यासक्रम.

पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम हीच ओळख असलेल्या देशभरातील महाविद्यालयांना आता कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करता येणार आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे श्रेयांक हे पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमांसाठीही वापरता येणार आहेत.
पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे, पदविकेचे शिक्षण देणाऱ्या संस्था अशी महाविद्यालयांची ओळख आहे. छोटय़ा कालावधीचे, रोजगारभिमुख, कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम हे प्रामुख्याने महाविद्यालयाची ओळख नसलेल्या खासगी संस्था चालवतात. त्यांना कौशल्य विकास विकास महामंडळाच्या आखत्यारित आणण्यात आले. आता त्याला समांतर यंत्रणा महाविद्यालये उभी करू शकणार आहेत. महाविद्यालयांना तीन ते सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे श्रेयांकही मिळणार असून ते श्रेयांक पेढीत जमा होणार आहेत. मिळालेले श्रेयांक विद्यार्थी अनुषंगिक प्रमाणात पदवी किंना पदविका अभ्यासक्रमासाठी वापरू शकतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत