देशमुख्यपानराजकीय

तेलंगणाच्या DGP अंजनी कुमार यांचं निलंबन

पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निवडणूक आयोगाने निलंबन केले आहे. तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजली कुमार यांनी रविवारी सकाळी राज्य पोलीस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल अधिकारी (खर्च विभाग) महेश भागवत यांनी तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीतील मतमोजणीदरम्यान हैदराबादमध्ये राज्य काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती . त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पत्र लिहून अंजनी कुमार यांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. पोलीस महासंचालकांनी अनुमुला रेवंत रेड्डी यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिला. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.मतमोजणीच्या काळात घेतलेली ही भेट त्यांना महागात पडली असून निवडणूक आयोगाने त्यांचे निलंबन केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!