पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांच्या बेछूट गोळीबारात तीन इस्रायली नागरिक ठार

पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी एका बस थांब्यावर केलेल्या बेछूट गोळीबारात गुरुवारी तीन इस्रायली नागरिक ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. हल्लेखोर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेचे हस्तक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.४०च्या सुमारास ही घटना घडली. जेरुसलेमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वेझमन स्ट्रीटवर एका वाहनातून दोन पॅलेस्टिनी बंदूकधारी उतरले आणि त्यांनी बसथांब्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात तीन नागरिक जागीच ठार झाले, तर सहा जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी कर्तव्यावर नसलेले दोन इस्रायली सैनिक होते. त्यांनी आणि एका शस्त्रधारी नागरिकाने दहशतवाद्यांच्या दिशेने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. इस्रायल आणि हमास इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हल्लोखोरांची नावे मुराद आणि इब्राहिम अशी आहेत. ते सख्खे भाऊ असून त्यांचे वास्तव्य पूर्व इस्रायलमध्ये आहे. हे दोघेही हल्लेखोर हमास या दहशतवादी संघटनेचे आहेत. दहशतवादी कृत्यांबद्दल त्यांना पूर्वी शिक्षाही झाली होती. इस्रायल आणि हमासदरम्यान तात्पुरत्या युद्धविरामाची मुदत सात दिवस करण्यावर मतैक्य झाल्यानंतर लगेचच हा हल्ला करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत