एआय आणि रोबोटिक्समुळे जग किती बदलू शकतं याची एक झलक.

डिक्टाडोर ही कोलंबियातीलआहे या कंपनीने चक्क एका रोबोटची सीईओ म्हणून निवड केली आहे. मिका ही ह्यूमॅनॉईड रोबोट आता या कंपनीची धुरा सांभाळणार आहे. एआय आणि रोबोटिक्समुळे जग किती बदलू शकतं याची एक झलक यातून पहायला मिळत आहे.
डिक्टाडोर आणि हॅन्सन रोबोटिक्स कंपनीने मिळून मिकाला तयार केलं आहे. हॅन्सन कंपनीने यापूर्वी देखील सोफिया ही प्रसिद्ध ह्यूमॅनॉईड रोबोट तयार केली होती. या क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून हॅन्सन ओळखली जाते.
डिक्टाडोरने आपल्या कंपनीची मूल्यं आणि गरजा लक्षात घेऊन, त्यानुसार हा रोबोट कस्टमाईज केला आहे. यामुळे एक बोर्ड मेंबर म्हणून मिका वेगळा विचार करू शकेल, तसंच धोरणात्मक निर्णय देखील घेऊ शकेल. अॅडव्हान्स एआय टेक्नॉलॉजी आणि मशीन लर्निंग क्षमता यामुळे मिका जलद, आणि अचूक डेटा-आधारित निर्णय घेऊ शकते. कंपनीची उद्दिष्टे आणि लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन, आणि उपलब्ध डेटाचे अचूक विश्वेषण करुन निर्णय घेण्याची क्षमता मिकामध्ये आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत