वांद्रे-वरळी सी लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून केली आत्महत्या.

वांद्रे-वरळी सी लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश सिंह असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करणारा आकाश सिंह हा परळ येथील रहिवासी होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माझा मोबईल खाली पडला असा सांगत तो टॅक्सीमधून सी लिंकवर उतरला. त्यानंतर त्याने खाली उडी मारली. मच्छीमार नौकांच्या मदतीने पोलिसींनी आकाश सिंह याचा मृतदेहाचा शोध घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तो वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सीत बसला, पण नंतर त्याने ड्रायव्हरला सी लिंकवर नेण्यास सांगितले, असे वरळी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत