आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी कथित मद्य घोटाळ्यातील आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. तत्पूर्वी ईडीने त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आणि १० तास चौकशी केली. केंद्रीय यंत्रणेकडून अटक केलेल्या सत्येंद्र जैन व मनीष सिसोदियांनंतर संजय सिंह हे आपचे तिसरे प्रमुख नेते आहेत. ईडीच्या २७० पानांच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचा उल्लेख आहे. यात मध्यस्थ दिनेश अरोरा म्हणाले, माझ्या रेस्टॉरंटमध्ये संजय सिंह व दिल्लीच्या बार-रेस्टॉरंट मालकांची बैठक झाली होती. यास सिसोदिया हजर होते. ते म्हणाले होते, सत्तेत आल्यानंतर दिल्लीचे उत्पादन शुल्क धोरण ठरवताना आम आदमी पक्ष सर्वांच्या हितांची काळजी घेईल. यानंतर अरोरा यांनी पक्ष निधीसाठी ८२ लाख रुपयांचा धनादेश दिला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत