बोरिवली ते मुलुंड आता एका तासात पोहोचणे शक्य

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी पालिकेकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. बोरिवली ते मुलुंड हे अंतर फक्त एक तासात पार करता येईल. मालाड पश्चिम येथील मालाड जलाशय ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अप्पापाडादरम्यान मुंबई महापालिका नवीन उड्डाणपूल पूल बांधणार आहे. हा पूल गोरेगाव-मुलुंड लिंक रस्त्याला जोडला जाणार आहे. या उड्डाणपुलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ३० टक्के भार कमी होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रस्ता तसेच आरे कॉलनी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीत नवीन रस्ते विकसीत करून महामार्गावरील भार कमी केला जात आहे. या प्रयत्नात आता मालाड पश्चिमेला नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. विकास आराखडा २०३४ मध्ये मालाड पश्चिम येथील मालाड जलाशय ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या अप्पापाडापर्यंत पहिल्या टप्प्यात १८.३० मीटर मार्गाचा विकास प्रस्तावित करण्यात आला आहे. या अंतर्गत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ९०० मीटर लांबीचा हा पूल असून सिमेंट काँक्रीट, स्टीलचा वापर करून बांधण्यात येणार आहे. तसेच सिमेंट काँक्रीटचा पोहोच रस्ताही बांधण्यात येणार आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत