
लष्करप्रमुख राजौरी सेक्टरला भेट देऊन, तिथल्या दहशतवादविरोधी मोहिमा आणि अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधल्या जीवितहानीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याचं यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे. या हल्ल्यात लष्कराचे चार जवान शहीद झाले होते. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आज जम्मू भेटीवर आले असून, ते पुंछला रवाना झाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यात अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. या भेटीत ते सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेतील, आणि दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक बळकट करण्यासंदर्भातही चर्चा करतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत