मुख्यपानमुंबई/कोंकण

कागदात तलवार लपवून फिरणारा पोलिसांच्या ताब्यात.

कल्याण पूर्वेतील वाढत्या गुन्हेगारीला अंकूश लावण्यासाठी कल्याण कोळशेवाडी पाेलिसांनी कल्याण पूर्वेत गस्ती वाढवल्या आहेत. तरी देखील कल्याण पूर्वेत कागदामध्ये तलवार घेऊन एक जण फिरत होता. गस्त घालत असलेल्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या दरम्यान काल गस्ती दरम्यान कोळशेवाडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. राज तिवारी नावाच्या एका गुन्हेगाराला तलवारीसह अटक करण्यात आली आहे. तर एका लूटीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या घनश्याम कनोजिया याला देखील अटक करण्यात आली.
कोळसेवाडी पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पेलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. गुरुवारी पोलिस अधिकारी रविराज मदने यांचे पथक गस्तीवर असताना एक सराईत गुन्हेगार महागड्यावर गाडीवर फिरत होता. त्याने कागदात लपेटून तलवार गाडीच्या टाकीवर ठेवली होती. पोलिसांनी राज तिवारी याला पकडले. त्याच्याकडून तलवार मिळून आली. त्याच प्रमाणे कोळसेवाडी पोलिसांनी एका लूटीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या घनश्याम कनोजिया याला देखील अटक केली आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!