मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तुळजापूर तालुक्यात तब्बल 100 उपासकांच्या धम्मदिक्षेने अश्विन पौर्णिमा साजरी.

शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका तुळजापूर शाखेच्या वतीने अश्विन पौर्णिमा, वर्षावास समापन आणि अशोक विजयादशमी निमित्त आयोजित तालुक्यामधील विविध 8 गावातील विहारांमध्ये एकूण 100 पेक्षा जास्त उपासक उपासिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

अश्विन पौर्णिमा साजरी करण्यासाठी गावोगावी विशेष वंदनेचे आयोजन करण्यात आले होते पैकी मौजे अपसिंगा येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष विजयमालाताई धावारे कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम तसेच केंद्रीय शिक्षक आदरणीय गुणवंत सोनवणे सर यांच्यासह जिल्हा कार्यकारणी तसेच तुळजापूर तालुकाध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे सरचिटणीस विठ्ठल सुरते, पर्यटन सचिव गौतम सोनवणे यांच्यासह समता सैनिक, बोधाचार्य व तालुका व ग्राम शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन अश्विन पौर्णिमा हर्ष उल्हासात साजरी केली. केंद्रीय शिक्षक आयु. गुणवंत सोनवणे सर यांनी उपस्थितांना 22 प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षित केले.

तुळजापूर तालुक्यामध्ये ढेकरी, हंगरगा, वडगाव लाख, ईटकळ, नळदुर्ग, आपसींगा आणि तुळजापूर शहर या ठिकाणी वर्षावास समापनाचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्ष उल्हासात घेण्यात आले. आजही उर्वरित गावांमध्ये वर्षावास समापन कार्यक्रम आयोजित केले आहेत. मौजे आपसिंगा येथील 50 पेक्षा जास्त लोकांनी तसेच तालुक्यातील इतर ठिकाणच्या मिळून एकूण 100 पेक्षा जास्त लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आपण यापुढे कोणत्याही अंधश्रध्देत, व्यसनात न राहता कसल्याही कर्मकांडाला बळी न पडता मानव कल्याणाचा बौद्ध धर्म स्वीकारणार असून त्यानुसार शील सदाचाराचे आचरण करणार आहोत अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा हिशोब तपासणीस देविदास कदम यांनी तर आभार प्रदर्शन आपसिंगा येथील आयु. सचिन सोनवणे यांनी केले. धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे काळाची गरज आहे त्यासाठी धम्म संस्था बळकट करणे आवश्यक आहे ही जाणीव सोबत घेऊन सरणतेय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

2 Comments

  1. जागृतीचा विस्तव विझू देऊ नका..
    – डॉ बाबासाहेब आंबेडकर.
    खूप छान बातमी दिलीत. टीम जागृत भारत चे खूप खूप आभार.

Leave a Reply to दैनिक जागृत भारत Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!