प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

संस्मरण भिडेवाडयाचेसंस्मरण भिडेवाडयाला राष्ट्रीय स्मारक करण्याचे.

अशोक तुळशीराम भवरे, नांदेड


या देशातील सर्व सन्माननीय महिला वर्ग, सर्व सन्माननीय पुरुष बांधव.

जयभीम,जय सावित्री ज्योतिबा,जय संविधान,जय भारत.

*नुकताच कोर्टाने निकाल दिल्यामुळे सावित्रीमाईची लेकी, राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे मुलं अतिशय आनंदीत झाले आणि साहजिकच आहे कित्येक वर्षांपासून जो खटला प्रलंबित होता तो पुणे महापालिकेच्या बाजूने लागला आणि फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला.* *यासाठी अनेक संघटनांनी, संस्थांनी, महिलांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, आम्ही सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून विविध लेख खास करुन खालील लेख लिहून स्मरण देत होतो, आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आपण कोर्टात जिंकलो असलो तरी जोपर्यंत स्मारक होणार नाही तोपर्यंत आपण शांत बसायचे नाही म्हणून हे स्मरण राष्ट्रीय स्मारक होईपर्यंत दर रविवारी आपल्या सेवेत येत राहणार आहे जेणेकरून प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव होत राहील.* *येत्या २८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फुले वाड्यावर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून फुले यांना अभिवादन करून जोपर्यंत भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणार नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही अशी प्रतिज्ञा करुन समारोप भिडे वाड्यावर करु या, आपणांस काय वाटते हे जरुर कळवा, जेणेकरून तसे प्रयत्न करता येईल, कार्यक्रमाचे आयोजन करता येईल.


सर्वांना नम्र निवेदन आहे की, भिडे वाडा हा आधुनिक भारताचा शिक्षणाचा दिपस्तंभ आहे,याच वाड्यात पहिली मुलींची शाळा १जानेवारी १८४८ रोजी स्थापन झाली,या शाळेत चार ब्राह्मण मुली व इतर दोन मुली होत्या,आज यांच्याच प्रेरणेने करोडो मुली शिकत आहेत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत, या सर्वांचं उगम स्थान हा भिडे वाड्यात आहे.
दुर्दैवाने आज भिडे वाड्याची आज काय अवस्था झाली आहे,कोण आहे या सर्वांला ?ज्या महिला साठी संघर्ष केला ती महिला आज आपल्या यशाचे श्रेय देवदैवतांना देत आहे, ज्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता,ती महिला आज ख-या अर्थानं शिक्षणाच्या देवी ला विसरून काल्पनिक देवांच्या मागे लागली आहे, अजूनही संधी आहे यामधून सावरण्याची, उपकार फेडण्याची.
ज्या वाड्यातून सावित्री ज्योतिबा यांच्या संकल्पनेतून व संघर्षानातून व फातिमा शेख, सगुणाबाई यांच्या सहकार्याने तसेच भिडे यांच्या दातृत्वामुळे मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली, यामुळे भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वात महिला आपले नाव गाजवू लागली त्या सर्वांना एक नम्र निवेदन आहे की…….. चला ऋणमुकत होण्यासाठी भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी एक जुटीन संघर्ष करु या , राष्ट्रीय स्मारक होत नाही तोपर्यंत सतत लढा देत राहूया….
ही भावना विस्मरणात जाऊ नये म्हणून दर रविवारी संस्मरण निवेदन घेऊन मी दर रविवारी आपल्या भेटीला येणार आहे, हे स्मरण निवेदन जोपर्यंत भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होणार नाही तोपर्यंत येतच राहणार आहे, या संस्मरण निवेदनला आपण ही भरभरून प्रतिसाद द्याल या अपेक्षेत…..!
आपलाच
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याख्याते, सिडको नांदेड.
९५२७६७३१०९.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!