देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर दहशतीचे वातावरण; गोळीबाराच्या घटनेत तीन व्यक्ती गंभीर जखमी

मणिपूर : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मागील कांही महिन्यांपासून संवेदनशील असलेल्या मणिपूर मध्येही पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे.

मात्र मणिपूरमधील मोइरांग विभागात एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराट पसरली असून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर लोक पळत असल्याचे दिसत आहे. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ असून यामध्ये गोळीबाराचा आवाज येण्याआधी मोठा गोंधळ सुरु असल्याचे दिसत आहे. या गोळीबारात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!