महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

राज्यभर राजकीय नेत्यांना गावबंदी असताना प्रकाश आंबेडकरांचे मात्र  उत्साहात स्वागत!

धुळे येथे अॅड. प्रकाश आंबेडकर कार्यक्रमासाठी आले असता, सकल मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर त्याला अपवाद ठरले.
ॲड आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करीत त्यांची भेट घेण्यात आली. सकल मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. त्याबाबत मराठा समाज सदैव ऋणी राहील असे यावेळी पदाधिकारी म्हणाले. सुधाकर दादा बेंद्रे, भानदास भाऊ बधे, जगन बापू ताकटे भोला भाऊ वाघ गोविंद भाऊ वाघ विनोद जगताप, प्रफुल माने, निंबा मराठे, वामनभाऊ मोहिते, भैया शिंदे, राजूभाऊ जाधव, ॲड. दिनेश काळे, दीपक गोंधळे, राजू काळे यांसह बहुसंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!