Multibagger Stock | गुंतवणूकदारांची तुफान कमाई, तीनच वर्षांत या कंपनीने केले मालामाल

खाद्यतेल, तूपाचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. गेल्या 3 वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 1500 टक्क्यांहून अधिकचा नफा मिळवून दिला. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचा शेअर 31 रुपयांच्या जवळपास होता. सध्या या शेअरचा भाव 500 रुपयांच्या पुढे पोहचला आहे. मार्च 2020 पासून ते आतापर्यंत कंपनीने गुंतवणूकदारांना 1508 टक्क्यांचा परतावा दिला आहे. आता कंपनी शेअर स्प्लिट (Split) करणार आहे. सध्या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. तो आता एक रुपयांच्या फेस व्हॅल्यूमध्ये येईल. म्हणजे कंपनी शेअरला 10 तुकड्यात विभाजीत करेल.
असा मिळेल शेअर स्प्लिट
बीसीएल इंडस्ट्रीज (BCL Industries) शेअर स्प्लिट करणार आहे. त्यासाठीची एक्स डेट 27 ऑक्टोबर आहे. सध्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. कंपनी शेअरला 10 तुकड्यात विभाजीत करेल. ज्यांच्याकडे या कंपनीचे 10 शेअर असतील, या शेअर स्प्लिटनंतर त्यांच्याकडील शेअरची संख्या 100 होईल. 26 ऑक्टोबरपर्यंत जे या कंपनीत गुंतवणूक करतील. त्यांना याचा फायदा होईल. ही कंपनी 12 ऑक्टोबर 1992 रोजी कंपनीने 1:1 प्रमाणात बोनस दिले होता. एकावर एक बोनसचे गिफ्ट दिले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत