मुख्य पान

शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आज ठाण्यामध्ये महत्त्वाचा बैठक शिंदे मार्गदर्शन करणार.

मुंबई– अखेर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ‘आझाद मैदान’वर होणार आहे. दसरा मेळावासाठी क्राॅस मैदान व आझाद मैदान ही मैदानं ठरवण्यात आली होती. मात्र शिवसेनेकडून आता आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (शिवसेना एकनाथ शिंदे दसरा मेळावा आझाद मैदा)

क्राॅस मैदान यावरती क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्याचे ठिकाण नक्की झालं आहे. शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याने शिंदे गटाकडून मैदानाचा शोध सुरु होता. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादर येथील शिवाजी पार्कवर घेण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यामुळे या दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होऊ लागले. मागच्या वर्षी ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला. त्यावेळी शिवसेना कोणाची याचा निर्णय झाला नसल्याने ठाकरे गटाला मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!