नळदुर्ग येथील मंडल अधिकारी जयंत गायकवाड यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव…

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील कर्तव्यदक्ष महसुल विभागाचे मंडल अधिकारी जयंत गायकवाड यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पालक मंत्री डॉ तानाजी सावंत डॉ सचिन ओम्बासे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गुप्ता पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या जन जिवनात महसुल विभागाचे अनन्य साधारण महत्व आहे .
धाराशिव येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या
महाराष्ट्र शासन महसुल व वन विभागाच्या वतीने मराठा आरक्षण , भुसंपादन , निवडणूक , अनुसुचित जाती , भटक्या जमाती , शिबीरे आयोजित करणे , अतिक्रमणे मुक्त करणे , महसुल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या व्यक्तींनाच महसुल व वन विभागाच्या वतीने नळदुर्ग येथील मंडल अधिकारी जयंत गायकवाड यांनी परिसरातील गोर गरीब जनतेना योग्य तो न्याय देऊन त्या पिडीत महिला आसो पुरुष त्यांचे समाधान करत समाधानाची भाषा करणारे मंडल अधिकारी जयंत गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री मा ना डॉ तानाजी सावंत धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले .
यावेळी धाराशिव जिल्ह्यातील माजीसैनिक पालक अधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते .
या गौरवास्पद कामगिरी केल्यामुळे तुळजापूर चे तहसिलदार अरविंद बोळंगे , पत्रकार दादासाहेब बनसोडे , एस के गायकवाड , बाबासाहेब बनसोडे , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , उत्तम बनजगोळे सर्व मंडल अधिकारी तलाठी नागरीकानी अभिनंदन कौतुक होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत