कौटुंबीक वादातून रिक्षाचालकाने केली पत्नीची हत्या

एका रिक्षाचालकाने कौटुंबिक वादातून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी रिक्षाचालकास अटक केली आहे.
अलीमुना अन्सारी (३५) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी मयुद्दीन (३८) याला पोलिसांनी अटक केली आहे. मयुद्दीन हा टिटवाळा येथे रिक्षा चालविण्याचे काम करतो. मागील काही महिन्यांपासून मयुद्दीन याचे पत्नी अलीमुना हिच्याबरोबर कौटुंबिक वाद होते. सोमवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले. राग अनावर झाल्याने मयुद्दीन याने लाकडी दांडक्याने अलीमुनाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. हा प्रकार समजताच टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी मयुद्दीनवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत