परभणी येथील भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेफिरूवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .

नळदुर्ग येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेधार्थ निवेदन देण्यात आले .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
परभणी येथे एका नराधमाने भारतीय संविधानाची उद्देशिका जाणिव पुर्वक फाडून संविधानाचा अवमान केला असून सदर प्रकार हा निंदनीय आहे.या निंदनीय घटनेचा नळदुर्ग ता.तुळजापूर येथे जाहीर निषेध करून संबंधित गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरात भारतीय संविधानाचे अमृता मोहत्सवी वर्षं साजरं करण्यात येत असून ठिकठिकाणी संविधान गौरव प्रित्यर्थ विविध कार्यक्रम आयोजित केले जात असताना परभणीत मात्र केवळ द्वेषभावनेतून परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी लावली संविधानाची उद्देशिका माथेफिरू नराधम सोपान दत्ताराव पवार यांनी भर रस्त्यावर फाडून संविधानाचा अवमान केला असून सदर घटनेचा रिपाइं (आठवले)च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधित गुन्हेगारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा या संदर्भात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी देण्यात आलेल्या लेखी निवेदनावर रिपाइं (आठवले) चे जिल्हा समन्वयक बाबासाहेब बनसोडे,एस.के.गायकवाड, अरूण लोखंडे, नळदुर्ग शहर अध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयम स्कुलचे संस्थापक अध्यक्ष मारूती खारवे, रिपाइं चे सुरेश लोंढे,राम लोंढे,उमेश गायकवाड, राजकुमार वाघमारे, अनिल वाघमारे,अजय दुपारगुडे, आदींच्या सह्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत