देश-विदेशशैक्षणिक

भारतीय विद्यार्थिनीने 16व्या वर्षी उभारली कोट्यवधींची AI कंपनी.

१६ वर्षीय प्रांजली एक स्टार्टअप संस्थापक असून तिने आत्तापर्यंत Delv.AI या आपल्या स्टार्टअपसाठी तीन वेगवेगळ्या राउंडद्वारे सुमारे ३.७ कोटी रुपयांचा निधी मिळवला असून यासह सध्या प्रांजलीच्या या कंपनीचे मूल्य १०० कोटींच्या आसपास पोहोचले आहे. मियामी टेक वीक इव्हेंट दरम्यान प्रांजलीने आपल्या स्टार्टअपच्या मदतीने सर्वांना आश्चर्यचकित केले.

प्रांजली सध्या अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहते. कुटुंब भारतातून स्थलांतरित होऊन फ्लोरिडामध्ये स्थायिक झाले तेव्हा तिचे वय ११ वर्ष होते. प्रांजलीचे वडील एक अभियंता (इंजिनिअर) असून शाळेत मुख्य शिक्षणासह मुलांना संगणक विज्ञान देखील शिकवले पाहिजे अशा मतांचे ते आहेत. त्यांच्या याच आवडीचा परिणाम प्रांजलीवर पडला आणि तिने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी कोडिंग करायला सुरूवात केली. फ्लोरिडाला गेल्यावर ती फार खुश होती कारण इथे ती संगणक विज्ञानाचे शिक्षण घेऊ शकत होती.

प्रांजली अवघ्या १३ वर्षांची असताना तिला इंटर्नशिप दरम्यान युनिव्हर्सिटी रिसर्च लॅबमधून आपल्या स्टार्टअप कंपनीची कल्पना सुचली. करोनाच्या काळात जेव्हा हायस्कूलमध्ये शिकत होती, तेव्हा सर्वकाही व्हर्च्युअल झाले होते, त्यामुळे प्रांजलीला आठवड्यातून सुमारे २० तास इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. या अंतर्गत ती रिसर्च करायची, डेटा काढायची आणि साहित्य परीक्षणे तयार करायची. OpenAI ने २०२० मध्ये ChatGPT-3 ची बीटा आवृत्ती जारी केली तेव्हा, प्रांजलीने डेटा सहजपणे काढण्यासाठी आणि सारांशित करण्यासाठी त्याचा वापर केला.

प्रांजलीने फेलोशिप दरम्यान AI कम्युनिटीमध्ये अनेक मजबूत कनेक्शन जोडले. प्रांजलीने आत्तापर्यंत ४.५ लाख डॉलरचा निधी उभारला असून क्रंचबेसच्या माहितीनुसार कंपनीने १ डिसेंबर २०२१ रोजी पहिली प्री-सीड फेरी आयोजित केली, ज्या अंतर्गत तिने $२.५ लाख जमा केले. त्यानंतर १५ जानेवारी २०२२ रोजी दुसरी प्री-सीड फेरी आयोजित केली आणि ५० हजार डॉलर्स आणि २० जानेवारी २०२३ रोजी सुमारे १.५ लाख डॉलर्स जमा केले. तर आज प्रांजलीची कंपनी Delv.AI चे मूल्यांकन १२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १०० कोटी रुपये झाले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!