
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वांत उंच पुतळा उत्तर अमेरिकेत उभारण्यात आला असून येत्या १४ तारखेला पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या १९ फूट ठेवीच्या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी असे नाव देण्यात आले आहे.
उत्तर अमेरिकेतील मेरीलँड या राज्यातील अकोकीक शहरात १३ एकरवर डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (एआयसी) उभारण्यात येत आहे. या केंद्रामध्येच बाबासाहेबांचा हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. अकोकीक हे शहर वॉशिंग्टनपासून ३५ कि.मी. वर आहे. या केंद्रामध्ये डॉ. आंबेडकर स्मारक साकारण्यात येत असून या स्मारकामध्येच हा पुतळा उभारला आहे, अशी माहिती एआयसीकडून देण्यात आली. हे स्मारक डॉ. आंबेडकरांचा संदेश जगभरात पसरवून समानता व मानवाधिकारांचे उत्तम उदाहरण बनेल, असा विश्वासही एआयने व्यक्त केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. ते आपल्या अनुयायांमध्ये बाबासाहेब म्हणून लोकप्रिय होते. संविधान सभेच्या सर्वांत महत्वपूर्ण मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. या अध्यक्षपदानेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी ओळख मिळवून दिली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉ. अंबेडकर कायदामंत्री होते. दलित व अस्पृश्यांच्या अधिकारासाठीच्या सामाजिक चळवळीत त्यांनी अमूल्य योगदान दिले. डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण ६ डिसेंबर1956 रोजी झाले त्याचप्रमाणे १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. हा दिवस त्यांच्या अनुयायांकडून धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी याच दिवशी मेरीलँडमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत