महाराष्ट्रमुख्यपान

१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज.

अवघ्या १२ वर्षांच्या एका मुलानं २६ तास त्या भीषण आणि भयावह परिस्थितीशीही कडवी झुंज दिली आणि शेवटी तिला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बीचवर भावंडांसोबत खेळत असताना गायब झालेला लखन देवीपूजक थेट दुसऱ्या दिवशी समुद्रात लांबवर फक्त एका लाकडी फळीच्या आधारावर तरंगत असलेला सापडला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला! नेमकं काय घडलं होतं?

समोर आलेल्या माहितीनुसार, हे सगळं घडलं २९ सप्टेंबर रोजी. १२ वर्षांचा लखन देवीपूजक त्याच्या करण (१२) व अंजली (८) या भावंडांसोबत सुरतच्या दमस समुद्र किनाऱ्यावर खेळत होता. सोबत आजी शेवंताबेन देवीपूजकही होती. “खेळता खेळता करन समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. लखननं त्याला घट्ट पकडलं आणि पाण्याबाहेर खेचलं. पण करनला बाहेर काढताना लखन पाण्यात खेचला गेला. हे साधारण दुपारी दीडच्या सुमारास घडलं”,

दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी नवसारी जिल्ह्यात्या भाट गावातले मच्छीमार रसिक तांडेल (४८) हे त्यांच्या एका सहकाऱ्यासमवेत समुद्रात बोट घेऊन गेले. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितला. “आम्हाला लांब काहीतरी हलताना दिसलं. नेमकं काय ते कळलं नाही. त्यामुळे आम्ही आणखी पुढे गेलो. जवळपास १२ नॉटिकल मैल. काही अंतरावर मला काहीतरी संशयित दिसलं. आम्ही आणखी पुढे गेल्यावर एक हात हलताना दिसला. आम्ही बुचकळ्यात पडलो. समुद्राच्या मध्यभागी इतक्या आत एक मुलगा फक्त एका लाकडी फळीच्या मदतीनं तरंगताना दिसत होता. आम्ही त्याच्या दिशेनं दोर फेकला आणि त्याला बोटीत ओढून घेतलं. अशा प्रकारे समुद्राच्या मध्यावर २६ तास तग धरून राहण्याच्या त्याच्या जिद्दीला खरंच सलाम आहे”, असं ते म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!