गोरेगाव, अंधेरीत 31 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी दुरुस्तीची कामं हाती घेतल्यामुळं शहरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण या विभागांमधील पाणीपुरवठा 31 ऑक्टोबर 2023 अर्थात, मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गा वरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटी जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम, वेरावली जलाशय १ व २ चे संरचना काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुमारे १५ तास के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील खालील नमूद परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत